ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर

औरंगाबाद,१७ डिसेंबर /प्रतिनिधी:- सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका 841/2021,विशेष अनुमती याचिका 19756/2021 व रिट याचिका क्र.1316/2021 मध्ये 15/12/2021 रोजीच्या निर्णयान्वये ग्रामपंचायत पोटनिवडणूक 21 मधील नागरिकांचा मागास प्रर्वगाच्या झालेल्या रिक्त जागा सर्वसाधारण करुन ग्रामपंचायत पोटनिवडणूक घेण्याकरीता सुधारीत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक यांच्या आदेशानुसार  तो खालीलप्रमाणे असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी कळविले आहे.

अ.क्र.निवडणूकीचे टप्पेदिनांक
1.ज्या ठिकाणी सोडत काढणे आवश्यक आहे तिथे सोडतीकरीता विशेष ग्रामसभेची सूचना देण्याचा दिनांकदिनांक 18/12/2021 (शनिवार)
2.विशेष ग्रामसभेमध्ये आवश्यकतेनुसार सर्वसाधारण जागा निश्चित करण्यासाठी सोडतीचा दिनांकदिनांक 20/12/2021 (सोमवार)
3.नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करुन त्याबाबत योग्य ती सूचना व प्रसिद्धी देण्याचा दिनांकदिनांक 20/12/2021 (सोमवार)
4.तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांकदिनांक 20/12/2021 (सोमवार)
5.नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)दिनांक 28/12/2021 (मंगळवार) ते दिनांक 03/01/2022 (सोमवार) वेळ सकाळी 11.00 ते दु.3.00(दिनांक 01/01/2022 शनिवार व दिनांक 02/01/2022 चा रविवार वगळून)
6.नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)दिनांक 04/01/2022 (मंगळवार) वेळ सकाळी 11.00 वाजल्यापासून छाननी संपेपर्यंत
7.नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)दिनांक 06/01/2022 (गुरुवार)दुपारी 03.00 वा.पर्यंत
8.निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळदिनांक 06/01/2022 (गुरुवार)दुपारी 03.00 वा.नंतर
9.आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांकदिनांक 18/01/2022 (मंगळवार)सकाळी 07.30 वा.पासून ते सायं.5.30 वा.पर्यंत (गडचिरोली जिल्ह्यासाठी सकाळी 7.30 वा.पासून ते दुपारी 3.00 वा.पर्यंत)
10.मतमोजणीचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसीलदार निश्चित करतील त्यानुसार राहील)दिनांक 19/01/2022 (बुधवार)
11.जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांकदिनांक 24/01/2022 (सोमवार) पर्यंत