वैजापूर शहरात कोरोनामुळे 84 जणांचा मृत्यू ; रुग्णांच्या वारसाला 50 हजारांची मदत मिळवून देण्यासाठी वैजापूर पालिकेची मोहीम

वैजापूर,१७ डिसेंबर /प्रतिनिधी :-वैजापूर शहरात कोरोनामुळे आतापर्यंत 84 जणांचा मृत्यू झाला असून, कोव्हीड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसाला रुपये 50,000 सानुग्रह मदत करण्यात येणार आहे त्यासाठी वैजापूर नागरपालिकेतर्फे युद्ध पातळीवर मोहिम सुरू करण्यात आली आहे.

या मोहिमेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या घरी नगर परिषद कर्मचारी भेट देऊन कोवीड मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मदत करून, त्यांच्या कडून आवश्यक कागदपत्रे यांची पूर्तता करून त्यांच्या कडून ऑनलाईन फॉर्म भरून घेणार आहेत.

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी https://mahacovid19relief.in/login या वेब साईट चा वापर करून खालील प्रमाणे कागदपत्रे लागतील1. Covid Testing Positive Report2. HRCT केला असल्यास तो रीपोर्ट3. हॉस्पिटल चे मृत्यू प्रमाणपत्र (MCCD Form 4 A– मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र)4. स्थानिक स्वराज्य संस्था चे मृत्यू प्रमाणपत्र.5. वैध वारसदार च्या बँक खात्याचा कॅन्सल चेक. एकाच वारसाच्या नावे अर्ज करावा आणि एकाच बॅंकेचे अकाऊंट असलेला कॅन्सल चेक.
शुक्रवार दिनांक 17 डिसेंबर 2021 पासून ही कार्यवाही युद्ध पातळीवर मोहिम स्वरुपात सुरु केली आहे.वैजापुर शहरात कोवीड मुळे आतापर्यन्त 84 मृत्यू झालेले आहेत. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या या 84 नागरिकांच्या वारसांना शासनातर्फे देण्यात येणारी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी पालिकेने ही मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी संबंधित नागरिक आणि यंत्रणांनी सहकार्य करावे असे आवाहन वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी बी.यु.बिघोत यांनी केले आहे.