रब्बी हंगामासाठी वैजापूर-गंगापूर तालुक्यासाठी नांदूर -मधमेश्वर कालव्यातुन 4.5 टीएमसी पाण्याचे नियोजन करा – आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर,१७ डिसेंबर /प्रतिनिधी :- रब्बी हंगामासाठी नांदुर मधमेश्वर कालव्यातून वैजापूर- गंगापूर तालुक्यासाठी 4.5 टीएमसी पाणी कसे मिळेल याचे नियोजन करा असे निर्देश आ.रमेश पाटील बोरणारे यांनी शुक्रवारी येथे नांदूर मधमेश्वर कालवा सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केले.

Displaying IMG-20211217-WA0113.jpg

नांदूर- मधमेश्वर कालव्यातून रब्बी आवर्तन सोडण्याविषयी नांदूर-मधमेश्वर कालवा समितीची आढावा बैठक आ.रमेश पाटील बोरणारे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस डॉ. व्ही. जी. शिंदे, माजी नगराध्यक्ष साबेर खान,कालवा सल्लागार समितीचे सदस्य  बाबासाहेब जगताप,बाजार समितीचे सभापती भागीनाथ मगर,मा.सभापती अंकुश पाटील हिंगे, कल्याण पाटील जगताप, नांदूर-मधमेश्वर कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता वनगुजरे, दिगंबर खंडागळे, सलीम वैजापुरी, संजय पवार, प्रभाकर सोनवणे यांच्यासह संबंधित अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

नांदूर-मधमेश्वर कालवा विभागांतर्गत असलेल्या भाम, भावली, वाकी व मुकणे या चारही धरणांत 11 टीएमसी पाणी आरक्षित असून त्यापैकी 3 टीएमसी पाणी वाया जाते उर्वरित 8 टीएमसी पाणी आपल्याला मिळाले पाहिजे मात्र 2003 पासून आतापर्यंत जेवण 3 टीएमसी पेक्षा जास्त पाणी मिळाले नाही.11 टीएमसी हक्काचे पाणी असून वैजापूर- गंगापूर व कोपरगांव या तालुक्यासाठी निदान 4.5 टीएमसी पाणी कसे मिळेल याचे नियोजन करा तसेच 15 ते 20 जानेवारी दरम्यान पहिले रोटेशन सोडन्यात यावे ते 30 दिवसाचे असावे त्यामुळे कोणालाही पाणी कमी पडणार नाही. दुसरे रोटेशन 10 ते 15 मार्च ला व तिसरे रोटेशन 25 ते 30 एप्रिलला असे रब्बीचे दोन व उन्हाळी एक एकूण तीनआवर्तन सोडण्याचे निर्देश आ.बोरणारे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने संबधित अधिकाऱ्यांना दिले. .शेतकरी पाण्याची मागणी कमी करत असल्याने केवळ 43,860 हजार हेक्टर क्षेत्रापैकी 10 ते 11 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे त्यामुळे  शेतकऱ्यांनी वेळेत व जास्तीत जास्त मागणी केल्यास 30 ते 35 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. मागणीच्या बाबतीत शेतकऱ्यांनी सक्रिय झाले पाहिजे अशी सूचना आ.बोरणारे यांनी यावेळी शेतकऱ्यांना केली.

पाणी वापर संस्थेच्या वितरिकेनुसार बैठका घ्या. शेतकऱ्यांच्या जमिनी नांदूर मधमेश्वर जलद कालव्याच्या वितरिकासाठी अनेक वर्षांपासून संपादित केल्या आहेत. त्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला अद्याप मिळाला नाही तो प्रश्न लवकर मार्गी लावा.असे आ.बोरणारे या आढावा बैठकीत म्हणाले.बैठकीस कालवा सल्लागार समिती चे सदस्य , अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.