महालगाव सोसायटीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सभापती अविनाश पाटील गलांडे यांच्या पॅनेलचा विजय

वैजापूर,२०जुलै /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील महालगाव विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या चुरशीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती तथा  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलच्या सर्वच्या सर्व 13 उमेदवारांनी भरघोस मतांनी विजय मिळवला.
या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते अशी:

सर्वसाधारण मतदारसंघ
आल्हाट चार्ल्स रंभाजी     – 510

आहेर दौलत दादा           – 524

काळे पुंजाराम काशीनाथ – 540

जाधव भागीनाथ योगाजी – 491

झिंजूर्डे विजय रामचंद्र      – 548

शेळके प्रकाश दगडू         – 576

सगेलके बापू गोविंदा        – 541

हुमे मधुकर काशीनाथ       – 548

महिला राखीव मतदारसंघ —

गलांडे मनीषा सिताराम       – 548
टेमकर उषा पंढरीनाथ         – 513

भटक्या- विमुक्त जाती मतदातसंघ —
बुट्टे बाळासाहेब ठाकजी       – 548

इतर मागासवर्गीय मतदारसंघ

अनर्थे बाबासाहेब नामदेव     – 591

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ 

आल्हाट रावसाहेब तुळशीराम- 542

निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांचे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेचे सभापती अविनाश पाटील गलांडे यांनी अभिनंदन केले तसेच मतदारांचे आभार मानले.