वैजापुरात विचारवंत उत्तम कांबळे यांचे 13 ऑगस्ट रोजी व्याख्यान

वैजापूर,११ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने  महसूल प्रशासन व वैजापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्यावतीने 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता येथील पंचायत समितीच्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक व  विचारवंत उत्तम कांबळे यांचे व्याख्यान  आयोजित करण्यात आले आहे.      

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव व प्रसार माध्यमांची भूमिका यासह विविध पैलूंवर  उत्तम कांबळे व्याख्यान देणार आहेत. पंचायत समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमास शहरासह तालुक्यातील नागरिकांसह साहित्यप्रेमींनी उपस्थितीत राहवे. असे आवाहन उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसिलदार राहुल गायकवाड, वैजापूर  तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय गायकवाड, सचिव मकरंद कुलकर्णी व  पदाधिकाऱ्यांनी केले आहे.