अवमान याचिकेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नोटीस

 औरंगाबाद, दिनांक 16:संस्थेत कार्यरत प्राध्यापकाला संपूर्ण वेतन देण्याचे आदेश देण्यात येऊनही त्याचे पालन न केल्याप्रकरणात दाखल अवमान याचिकेत नांदेड येथील शारदा भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक शंकरराव चव्हाण यांना अवमानना नोटीस बजावण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. उज्जल भुयान आणि न्या. एस. जी. सेवलीकर यांनी दिले.
प्रकरणात प्रा. सुरेश बळिराम गजभारे यांनी ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात अवमान याचिका दाखल केली आहे.

The Aurangabad Bench of the Bombay HC certifies the admissibility of print  outs of orders, uploaded on court websites, for use in Trial court  proceedings. - ReddyAndReddy

याचिकेनुसार, संस्थेच्या शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे ते प्राध्यापक म्हणून काम करताहेत. संस्थेने दिलेल्या जाहिरातीला अनुषंगूनच त्यांची नेमणूक झाली तसेच त्यांना विद्यापीठाने पदमान्यताही दिलेली होती. मात्र संस्थेने त्यांना रुजू झाल्यापासून याचिका दाखल करेपर्यंत केवळ ८० हजार रुपये मानधन म्हणून दिले. दरम्यान संस्थेचे कोषाध्यक्ष यांनी  महाविद्यालयाच्या प्राचार्यांना पत्र देऊन, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या विषयासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नयेत, असे कळविले. आपली नेमणूक २विनाअनुदान तत्वावर झालेली असल्याने आपल्याला संपूर्ण वेतन मिळावे याकरिता त्यांनी ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.
या याचिकेच्या सुनावणीअंती खंडपीठाने २१ सप्टेंबर २०१९ च्या आदेशान्वये २०११ पासून ते २०१७-१८ दरम्यानचे संपूर्ण वेतन याचिकाकर्त्याला तीन महिन्यांच्या आत देण्याचे आदेश दिले.
मात्र या आदेशाची अजूनही अंमलबजावणी न केल्याप्रकरणी दाखल अवमान याचिकेत, संस्थेचे अध्यक्ष अशोक शंकरराव चव्हाण, सचिव डी. पी. सावंत आणि प्राचार्य हनुमंत भोपळे यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेच्या प्राथमिक सुनावणीअंती खंडपीठाने संस्थेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना नोटीस वाजवण्याचे आदेश देत, पुढील सुनावणी २८ एप्रिलला ठेवली. प्रकरणात याचिकाकर्त्यातर्फे ऍड. सिद्धेश्वर ठोंबरे काम पाहत आहे