कॉ.टाकसाळ यांना मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्‍टीशनर्सच्‍या वतीने श्रध्‍दांजली

औरंगाबाद,७ डिसेंबर /प्रतिनिधी:- स्‍वांतत्र्य सैनिक कॉ. मनोहर टाकसाळ यांना मराठवाडा लेबर लॉ प्रॅक्‍टीशनर्सच असोसिएशनचे राजेश खंडेलवाल यांच्‍या अध्‍यक्षतेखाली शनिवारी दि.४ शोकसभा घेण्‍यात येवून त्‍यांना श्रध्‍दांजली वाहण्‍यात आली.

कॉ. अॅड. टाकसाळ यांनी १९६७ सालापासून गेल्या ५४ वर्षांत न्‍यायालयीन मार्गाने पक्षकारांना न्‍या मिळवून दिला. गरजू, गोर गरीबांची, अन्‍यायग्रस्‍तांची प्रकरणे पदरमोड करुन चालविली. दलित अत्‍याचार व सामाजिक प्रश्‍नांवर त्‍यांनी अनेक आंदोलनाचे नतृत्‍व केले. संपूर्ण आयुष्‍य कामगार, कर्मचारी, कष्‍टकरी, शेतमजुर व तळागाळातील पीडित लोकांसाठी न्‍यायालयीन लढा दिला. भूमिहीन , रोहयो कामगार, विद्यार्थी, आदिवसांच्‍या लढ्यातही नेटाने पुढाकार घेऊन प्रस्‍तापितांविरोधात संघर्ष उभा केला. त्‍यासाठी त्‍यांना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. त्‍यांचा वारसा पुढे नेणे हीच खरी श्रध्‍दांजली ठरले अशी भावना याप्रसंगी व्‍यक्त करण्‍यात आली.

यावेळी जे.एस. भोवते,  बी.एच. गायकवाड, रमेशभाई खंडागळे, चिंचोलकर,  डॉ. सी.एस. टेंभूर्णीकर, विनोद मुंदडा, शेख कय्युम, अशोक मोरे, सुरेश वाघचौरे, आर.के. मोकळे, भगवान भोजने, बी.एम. वावळकर, इमले, लता मोरे, एम.ए. मिर्झा आदींची उपस्थिती होती.