केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा – आमदार प्रशांत बंब

खुलताबाद ,१८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा असे आवाहन आमदार प्रशांत बंब यांनी केले.
मंबापुरवाडी  बुथ क्रमांक ७१  ता.खुलताबाद येथील बुथसमितीची बैठक शक्तीकेंद्र प्रमुख आमदार प्रशांत बंब यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी  मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बुथ समितीत असलेल्या सर्व सदस्याचे नाव, मोबाईल क्रमांक, याबाबत पडताळणी करून आमदार बंब यांनी मार्गदर्शन केले.

Displaying IMG-20211018-WA0023.jpg

याप्रसंगी आमदार प्रशांत बंब यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. केंद्र सरकारच्या सुरू असलेल्या वैयक्तिक लाभाच्या योजना किसान सन्मान योजना, आयुष्यमान भारत योजना, उज्ज्वला गॅस योजना ,मोफत धान्य वाटप ,अशा अनेक योजना मिळालेल्या लाभार्थ्यांचा  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनानिमित्त केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांना लाभार्थी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी प्रभारी माजी सभापती भिमराव खंडागळे, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल निकुंभ, बुथप्रमुख विठ्ठल गोमलाडु,  श्रीकांत जाधव, विजय राठोड, महेंद्र दगडफोडे,  अजिम मनियार, राहुल हजारे , अमोल गवळी,  कृष्णा पांडव, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ समिती सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.