अल्पवयीन मुलीचे अपहरण,आणखी एका आरोपीला अटक

औरंगाबाद, दि. २ :
अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिला पालनपूर (गुजरात) येथे तिन लाखांना विक्री केल्याप्रकरणात सिडको पोलिसांनी पालनपूर येथून आणखी एका आरोपीला शुक्रवारी दि.1 सायंकाळी अटक केली. राहूल जितेंद्र डाबी (24, रा. लालबाग, पालनपूर जि. बनासकंठा गुजरात) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीला पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठोठाविण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एस. निंबाळकर यांनी शनिवारी दि.2 दिले.
विशेष म्हणजे सिडको पोलिसांनी पालनपूर पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या घरातून पीडितेला ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता पीडितेला यास्मिन व निलेशने विक्री केले होते. त्यानंतर पीडितेशी लग्‍न करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोपी राहूल डाबी याने कबुल केले.
प्रकरणात यापूर्वी आरोपी कादरखाँ हैरदखाँ पठाण याला पोलिसांनी पाठलाग करुन 30 डिसेंबररोजी अटक केली. तर न्यायालयाने त्याला पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 प्रकरणात 17 वर्षीय पीडितेच्या वडीलांनी फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीला दोन मुली व एक मुलगा आहे. त्यातील 17 पीडिता ही मोठी आहे. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी फिर्यादी हे पिसादेवी येथे फर्निचरचे काम करण्यासाठी गेले व रात्री दहा वाजता घरी आले. तेव्हा पीडिता सायंकाळी पाच वाजेपासून बाहेर गेली ती अद्याप आली नसल्याने फिर्यादीच्या मुलांनी त्यांना सांगितले. त्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे तिचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही.
26 डिसेंबर रोजी सायंकाळी पीडितेने फिर्यादीला फोन केला. तेंव्हा पीडितेला गुजरातला विक्री करण्यात आल्याची समजले. प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.