रेल्वेचे मालवाहतूकीतून उच्चांकी उत्पन्न

नवी दिल्‍ली, 2 जानेवारी 2021


भारतीय रेल्वेने मालवाहतूक करून उच्चांकी उत्पन्न मिळविण्यात आणि माल वाहून नेण्यात डिसेंबर 2020 मध्येही सातत्य कायम राखले आहे.

Railway freight records 9% increase in November

डिसेंबर 2020मध्ये भारतीय रेल्वेने 118.13 दशलक्ष टन मालवाहतूक केली. हा आकडा गेल्यावर्षीच्या याच कालवधीपेक्षा 8.54 टक्के जास्त आहे. गेल्यावर्षी रेल्वेने 108.84 दशलक्ष टन मालाची वाहतूक या काळात केली होती.

या काळामध्ये भारतीय रेल्वेने 11788.11 कोटींचे उत्पन्न मालवाहतूक करून मिळवले. तर गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाच्या डिसेंबरमध्ये रेल्वेने 757.74 कोटी रूपये जास्त (6.87 टक्के) उत्पन्न मिळवले आहे. गेल्यावर्षी रेल्वेला या काळात मालवाहतुकीतून 11030.37 कोटी उत्पन्न झाले होते.

कोविड-19 आव्हानाला संधी मानून भारतीय रेल्वेने आपल्या कार्यक्षमता आणि कामगिरीमध्ये सुधारणा करून मालवाहतुकीतून उच्चांकी उत्पन्न मिळवले. त्याचबरोबर मालवाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीही दिल्या जात आहेत. मालवाहतुकीच्या भाडेवृद्धीसाठी संस्थात्मक सुधारणाही केल्या जात असून शून्याधारित वेळापत्रकाचा समावेश करण्यात येणार आहे.