औरंगाबाद जिल्ह्यात 44484 कोरोनामुक्त,463 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 08 : औरंगाबाद जिल्ह्यात आज 76 जणांना (मनपा 54, ग्रामीण 22 सुटी देण्यात आली. आजपर्यंत 44484 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 66 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 46159 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1212 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 463 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (52) बीड बायपास (2), पडेगाव (2), सातारा परिसर(1), एमजीएम सायन्स सेंटर (1), पदमपुरा (2), जाधववाडी (1), आनंद गाडे नगर (1), सिडको एन -8 (2), मयूरबन कॉलनी (2), एसआरपीएफ कॅम्प (1), एन-1 सिडको (1), स्पोर्ट ॲथोरिटी ऑफ इंडिया (साई) (1), गजानन नगर, सिडको (3), उल्कानगरी (1), व्दारकादास नगर (1), शिवाजी नगर (2), जयभवानी नगर (1), काल्डा कॉर्नर (3), श्रेय नगर (5), सिटी केअर हॉस्पिटल परिसर (1), हडको (3), एन-1 सिडको (1), अन्य (14)

ग्रामीण (14)बोधेगाव, फुलंब्री (1), अन्य (13)