वैजापूर तालुक्यात 10 कोटी रूपये खर्चाच्या विविध विकासकामांचे ह.भ.प.रामगिरी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन

वैजापूर ,१८ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नागमठाण ते चेंडूफळ (प्रजिमा- 29) या चौदा कि.मी.रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण यासह विविध विकास कामांचे भूमिपूजन सराला बेटचे मठाधिपती ह.भ.प.रामगिरी महाराज यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. रमेश पाटील बोरणारे होते.नागमठाण ते चेंडूफळ या 14 कि.मी. रस्त्याचे काम मंजूर होऊन दोन वर्षे झाली होती. परंतु निधीअभावी हे काम रखडले होते.जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत आ.बोरणारे व जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे यांनी या रस्त्याचा विषय मांडून रस्त्याच्या कामासाठी लागणारा 9 कोटी 46 लक्ष रुपयांचा निधी मंजूर आणला.या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ तसेच शनी देवगांव येथील शनी मंदिर परिसरात 5 लक्ष रुपये खर्च करून बसविण्यात येणाऱ्या पेव्हर ब्लॉक कामाचे व जिल्हा परिषद-पंचायत समिती अंतर्गत15 लक्ष रुपये खर्चच्या गावांतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आदी दहा कोटी रुपये निधीच्या कामाचे भूमिपूजन सराला बेटाचे मठाधिपती ह.भ.प.रामगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन वाणी,उपतालुकाप्रमुख सिताराम भराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री.काकड, महेश बुणगे, युवासेनेचे पांडुरंग कापे,प्रल्हाद पवार,रामनाथ तांबे,बाळासाहेब पवार,प्रवीण मेघळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.