राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी सुदाम सोनवणेंची नियुक्ती

औरंगाबाद : येथील माजी महापौर सुदाम सोनवणे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी माजी मंत्री जयसिंग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष गायकवाड, काँग्रेसचे वैâलास पाटील यांची उपस्थिती होती. मागील महिन्यात सुदाम सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी मंत्री एकनाथ खडसें सोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या नियुक्तीचे बाबासाहेब दांडगे, संतोष करपे, धनंजय भागवत, ग्रामपंचायत सदस्य शाम कर्डीले, मुकेश परदेशी यांनी अभिनंदन केले आहे.