सावधान औरंगाबादकरांनो ,183 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर

औरंगाबाद,७ जानेवारी /प्रतिनिधी:- औरंगाबाद जिल्ह्यात आज 28 जणांना (मनपा 24, ग्रामीण 04) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 285 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 183 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 50 हजार 470 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 527 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

 मनपा (151)

घाटी होस्टेल  2, खडकेश्वर 1, घाटी 1, मिल्ट्री हॉस्पिटल 1, रेल्वेस्टेशन 1, संभाजी कॉलनी 1, शिवकृपा कॉलनी 1, इटखेडा 2, मकाई गेट 1, नंदावन कॉलनी  1, वसुंधरा कॉलनी  2, न्यु पहाडसिंगपुरा 1, एन- वन येथे  2, रामनगर 1, करीम कॉलनी  1, व्यकटेश नगर 1, कटकट गेट 1, जाधववाडी  1, एन- पाच येथे 2, पिसादेवी 1, एन- सात येथे 3, ज्योती नगर 1, हनुमान नगर 1, आकाशवाणी 1, गारखेडा पसिर 2, समर्थ नगर 1, छत्रपती नगर 1, एमआयटी कॉलेज 1, सातारा परिसर 1, वेंदात नगर 1, एसबी कॉलनी 1, बीड बायपास 2, गादिया विहार 2, देवगिरी गर्ल्स होस्टेल 1, श्रेयनगर 3, नंदनवन कॉलनी  1, छावणी  1, शिवाजीनगर 1, जवाहर कॉलनी 1, त्रिमुर्ती चौक 1, गजानन  कॉलनी  1,एन- चार येथे 4, ठाकरे नगर 1, हर्सुल 1, सिडको टाऊन सेंटर 1, एअरपोर्ट स्टाफ 1, रामनगर 1, शहानुरवाडी 1, क्रांती चौक 1, कोकणवाडी  1, बन्सीलाल नगर 1, टिळक नगर 1, कमलनयन बजाज हॉस्पीटल परिसर 4, रोशन गेट  1, समर्थ नगर 2, कांचनवाडी  1, महू नगर 1, अन्य 75

 ग्रामीण (32)

औरंगबाद 11, फुलंब्री 4, गंगापूर 4, कन्नड 4, खुलताबाद 1, सिल्लोड 1, वैजापूर 3,

पैठण 4