चालकाला दांड्याने मारहाण ,आरोपी गजाआड

औरंगाबाद, दिनांक 07 :
पान टपरी चालकाला दांड्याने मारहाण करुन खीशातील सात हजार रुपये रोख व एटीएम कार्डव्दारे 11 हजार 500 रुपये असा सुमारे 18 हजार 500 रुपय बळजबरी घेतल्याप्रकरणी पोलिसांनी चौथ्या आरोपीला शुक्रवारी दि.6 गजाआड केले. अक्षय उर्फ आकाश सतिष गायकवाड (25, रा. सावित्रीबाई फुलेनगर, वडगाल कोल्हाटी ता.जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव असुन त्याला 9 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी.एम. पोतदार यांनी शनिवारी दि.7 दिले.
गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांनी राधाकिसन उर्फ बाली पाटोळे, अमोल गायकवाड व उमेश जाधव यातिघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
प्रकरणात अक्षय सुरेश फुंदे (21, रा. वडगांव कोल्हाटी) याने फिर्याद दिली. त्यानुसार, फुंदे यांची मोहटा देवी चौक व कोलगेट चौक येथे साई पानशॉप नावाची पान टपरी आहे. 6 सप्टेबर रोजी फुंदे हा टापरीवर असतांना आरोपी बाली पाटोळे हा कार घेवुन आला व त्याने फुंदेला गाडीत बसवले. त्यावेळी गाडीत अक्षय गायकवाड, अमोल गायकवाड व उमेश जाधव बसलेले होते. त्यानंतर आरोपींनी कार अन्नाभाउ साठे चौकातील एका बंद अपार्टमेंन्ट मध्ये नेत फुंदे यांना दांड्याने मारहाण करुन खीशातील सात हजार रुपये बळजबरी हिसकावुन घेतले. तसेच आरोपींनी त्यांना मारहाणकरुन एटीएम व पीन घेतला. त्यानंर एटीएम मधुन 11 हजार 500 रुपये काढुन घेत, एटीएम कार्ड फुंदेला परत केले. प्रकरणात एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता सहाय्यक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली कार व चाकू जप्‍त करणे आहे. गुन्ह्यता आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत काय याचा तपास करणे आहे. आरोपींनी गुन्ह्याचा कट कोठे रचला याचा  देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.