मुलाची हत्या ,आई न्यायालयीन कोठडीत

औरंगाबाद, दिनांक 07 :
घरगुती कारणावरून मद्यपी मुलाची हत्या केल्याप्रकरणात आरोपी  आई तुळसाबाई शामराव शेळके (60, रा. आसेगाव ता. गंगापुर) आणि नातेवाईक पंढरीनाथ बाबुराव जाधव (55, आसेगाव फाटा ता. गंगापुर) या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.ए. काळे यांनी शनिवारी दि.7 दिले. दोघा आरोपींना 3 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. तर न्यायालयाने त्यांना आजपर्यंत पोलीसक कोठडी सुनावली होती.
प्रकरणात मयत कृष्णा शामराव शेळके (35, रा. आसेगाव, दौलताबाद)  याची पत्नी वंदना शेळके (30) हीने फिर्याद दिली. त्यानुसार मयत कृष्णा हा शेतीचा व्यवसाय करतो. त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा. त्यावरुन सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास आई तुळसाबाई आणि तिचा नातेवाईक पंढरीनाथ यांनी कृष्णाला लाठ्या-काठ्याने मारहाण केली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत सोडून दोघेही निघून गेले. सायंकाळी शेतातून कृष्णाचे कुटुंबिय घरी परतले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रकरणात दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.