अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयचा छापा,गुन्हा  दाखल

मुंबई ,२४ एप्रिल /प्रतिनिधी 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. देशमुख यांच्या राज्यातील अनेक मालमात्तांवर छापे टाकण्यात आले असून, देशमुख यांच्याशी संबधित 8-9 जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे न्यायालयाने सीबीआयला याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर देशमुख यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप केला होता. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहले होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली होती. खंडणी प्रकरणाची प्राथमिक चौकशी पूर्ण झाल्यानंतर सीबीआयने देशमुख यांच्या घरावर आणि मालमात्तांवर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईसह राज्यातील 10 ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. देशमुख यांच्याशी संबधित असलेल्या 8-9 जणांचे जबाब नोंदविले जात असल्याची माहिती समोर येत आहे.

छापेमारीनंतर अनिल देशमुख काय म्हणतात ?

‘सीबीआयची चमू आली. आम्ही त्यांना सहकार्य केले आहे. आता नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोव्हिड केंद्राला भेट देण्यासाठी जात आहोत,’ अशा मोजक्या शब्दात देशमुख यांनी छापेमारीवर आपली प्रतिक्रीया दिली.

देशमुखांवरील कारवाईनंतर सरकारमध्ये खळबळ

अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने एफआयआर दाखल केली असून, आज दहा ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. यानंतर मात्र, राजकीय घडामोडींना वेग आला. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपला पुणे दौरा रद्द करून तातडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याचे समजते. देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ही महत्वाची भेट मानली जात आहे.

अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल केल्यानंतर राज्य सरकार पुरते हादरले. ही कारवाई सुरू असताना, मु‘यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सकाळपासून मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरू होते.

सीबीआयच्या कारवाईनंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले. पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबईचे आयुक्त हेमंत नगराळे आणि राज्याचे अतिरिक्त मु‘य सचिव यांचे मु‘यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वर्षा बंगल्यावर दिवसभर बैठकांचे सत्र चालले. सूत्रांच्या मते, सीबीआयच्या हाती पुरावे लागल्याशिवाय त्यांनी गुन्हा दाखल करण्यासारखे मोठे पाऊल उचलले नाही.

.