पोलीस दलात मोठे बदल, अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई, 2 सप्टेंबर : सध्या राज्य सरकारने पोलीस दलात मोठे बदल केले आहे. सरकारने 40 हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश जारी केले आहेत.यामध्ये विश्वास नांगरे पाटील आणि कृष्णप्रकाश यांच्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली झाली आहे, तर कृष्णप्रकाश पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त झाले आहेत. 

 पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बदलीच्या आदेशावर स्वाक्षरी केली. विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था या पदी नियुक्ती झाली आहे. नाशिकमध्ये त्यांच्या जागी दीपक पांडे हे पदभार स्वीकारणार आहे. याशिवाय नाशिक परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची तुरुंग महानिरीक्षक पदी बदली झाली आहे. प्रताप दिघावकर हे आता विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.आठ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या महाविकासआघाडी सरकारने प्रथमच पोलीस दलात मोठे फेरबदल केले आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

१ विश्वास नांगरे पाटील – सह पोलीस आयुक्त, कायदा व सुव्यवस्था, मुंबई
२ मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त, क्राईम 
३ बिपीन सिंह –  पोलीस आयुक्त, नवी मुंबई
४ मनोज लोहिया – IGP, कोल्हापूर परीक्षेत्र
५ रणजितसिंह DG, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
६ कृष्णप्रकाश, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड
७ प्रताप दिघावकर, IGP, नाशिक परीक्षेत्र
८ दीपक पांडे, पोलीस आयुक्त, नाशिक
९ जगजित सिंह, ADG, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
१० डॉ. आरती सिंह, पोलीस आयुक्त, अमरावती
११ राजेंद्र सिंह, अपर पोलीस महासंचालक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई 
१२ आशुतोष डुंबरे, आयुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
१३ अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, नागपूर
१४ जयजीत सिंह, अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
१५ व्हि.के चौबे, अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई 
१६ सदानंद दाते, पोलीस आयुक्त मीरा-भाईंदर, वसई विरार
१७ भुषण कुमार, अपर पोलीस महासंचालक, वाहतूक, मुंबई 
१८ संजय कुमार, अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण खास पथके, मुंबई 
१९ रजनीश सेठ, महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग
२० यशस्वी यादव, सहपोलीस आयुक्त, वाहतूक, मुंबई
२१ मधुकर पाण्ड्ये, विशेष पोलीस महानिरिक्षक, सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा विभाग, मुंबई 
२२ राजकुमार व्हटकर, सहपोलीस आयुक्त, प्रशासन, मुंबई
२३ छेरिंग दोर्जे, विशेष पोली महानिरिक्षक, सुधारसेवा, मुंबई
२४ जय जाधव, सहपोलीस आयुक्त, नवी मुंबई
२५ निसार तांबोळी, विशेष पोलीस महानिरिक्षक, नांदेड परिक्षेत्र
२६ चंद्रकिशोर मिना, विशेष पोलीस महानिरिक्षक, अमरावती परिक्षेत्र
२७ संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व विभाग, मुंबई 
२८ संगणकल विरेश प्रभू, अपर पोलीस आयुक्त गुन्हे, मुंबई 
२९ सत्य नारायण, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण विभाग, मुंबई 
३० ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, मध्य विभाग, मुंबई 
३१ नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग, पुणे
३२ संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग मुंबई 
३३ एस.एच. महावरकर, पोलीस उपमहानिरिक्षक व दक्षता अधिकारी, सिडको
३४ लख्मी गौतम, पोलीस उपमहानिरिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
३५ विरेंद्र मिश्रा, अपर पोलीस आयुक्त, सशस्त्र पोलीस बल, मुंबई 
३६ एस जयकुमार, अपर पोलीस आयुक्त, मिरा-भाईंदर, वसई-विरार
३७ संदीप पाटील, पोलीस उपमहानिरिक्षक, गडचिरोली परिक्षेत्र
३८ सुहास वारके, विशेष पोलीस महानिरिक्षक, कायदा व सुव्यवस्था, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *