प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन,सचिन तेंडुलकर करणार प्लाझ्मा दान

मुंबई ,२४ एप्रिल /प्रतिनिधी 

‘क्रिकेटचा देव’ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 24 एप्रिल रोजी वाढदिवस आहे. भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेणार्‍या सचिनचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे जगभरातून सचिनवर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. आपल्या चाहत्यांचे आभार मानण्यासाठी सचिनने एक चित्रफीत सामायिक केली असून, कोरोना परिस्थितीवरून चाहत्यांना काळजी घेण्याचे आणि प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन केले आहे. आपण स्वत:ही प्लाझ्मा दान करणार असल्याचे सचिनने स्पष्ट केले आहे.

सचिन तेंडुलकरला मागच्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून तो नुकताच बरा झाला आहे. यामुळेच त्याने चित्रफितीच्या माध्यमातून उपचारादरम्यानचे अनुभव सांगितले व सर्वांना कळकळीचे आवाहन केले आहे. शुभेच्छा देणार्‍या चाहत्यांचे त्याने आभार मानले. आपल्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी या सर्वांनी मी बरा होण्यासाठी मदत केली.

mumgs_1  H x W:

सर्वांचे आभार मानल्यानंतर सचिनने चित्रफितीच्या माध्यमातून एक आवाहन केले. ‘मला डॉक्टरांनी सांगितलेला संदेश तुम्हाला द्यायचा आहे. मी मागच्या वर्षी प्लाझ्मा डोनेशन केंद्राचे उद्घाटन केले. प्लाझ्मा जर योग्यवेळी मिळाला तर बाधित लवकर बरा होऊ शकतो. मी योग्य वेळी प्लाझ्मा दान करणार आहे. माझे याबाबत डॉक्टरांशी बोलणे झाले आहे. तुमच्यापैकी जे कुणी कोरोनामधून बरे झाले असतील त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करावी आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा कृपा करून प्लाझ्मा दान करावे. त्यामुळे बराच त्रास कमी होईल. हा त्रास काय असतो ते तुम्हाला माहिती आहे. त्याचा तुम्हाला, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रांही त्रास होतो, तो त्रास कमी व्हावा यासाठी कृपया प्लाझ्मा दान करा’ असे आवाहन सचिनने केले आहे.