औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव द्या

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांकडे अधिसूचना काढण्याची विनंती

औरंगाबाद,१६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्यातील तमाम जनतेच्या मागणीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने नामकरण करण्याचा निर्णय मंजूर केला आहे. औरंगाबादच्या विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नाव देण्यात यावे, याबाबत अधिकृत अधिसूचना काढण्याची विनंती  शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्रासह निवेदन दिले.राज्यांची पर्यटन व मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादच्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यासाठी शिवसेनेने वारंवार पाठपुरावा केला होता. आता या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नाव देण्यात यावे, अशी शिवप्रेमी जनतेची मागणी आहे.

औरंगाबाद विमानतळाचे नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्याचा ठराव संभाजीनगर महानगरपालिकेने २४ एप्रिल २००२ रोजी बहुमताने मंजुर केला होता. राज्य सरकारने याबाबत ५ मार्च २०२०  राज्यसरकारने मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने निर्णय घेऊन मंजुरी दिली आहे. ६ जानेवारी २०२१ रोजी केंद्रीय केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांकडे अधिसूचना काढण्यासाठी प्रस्ताव दिला. यावर सर्व बाबींचा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना दिले.