मेसा इंग्रजी शाळा संघटनेचा ऑनलाईन शाळा बंद आंदोलन 1OO %  यशस्वी

पोलिस आयुक्ताच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

औरंगाबाद : शाळेची फी भरण्याबाबत व प्रवेश प्रक्रियेचे सबब पूढे करून शाळेचा संबध नसलेल्या गुंड व्यक्तिकडून द जैन इंटरनॅशनल स्कूल शहानुरवाडी औरंगाबाद या शाळेवर हल्ला करून प्राचार्यांचे दालनाचे तोड मोड करून मोठे नुकसान करून फरार झाले यामुळे प्राचार्य संतोषकुमार सहीत शाळा कर्मचारी मध्ये दहशद निर्माण झाली.यांचा निषेध म्हणून आज मेसा इंग्रजी शाळा संघटनेच्या वतीने  ऑनलाईन शिक्षण शाळा बंद आंदोलन छेडण्यात आले होते त्यास औरंगाबाद सहीत जालना ,लातूरमध्ये शाळांनी एकजूट दाखवून 100% बंद यशस्वी झाला असल्याचे मेसाचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे ‘सरचिटणीस  प्रविण आव्हाळे उपाध्यक्ष नागेश जोशी जिल्हाध्यक्ष रत्नाकर फाळके जिल्हा सचिव विश्वासराव दाभाडे  संजय पाटील , तुकाराम मुंढे , जगदीश , उमेश अहीरराव यांनी सांगीतले
  आज मेसाचे शिष्टमंडळ पोलिस आयुक्त डॉ़ निखिल गुप्ता यांना भेटून निवेदन देवून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी केली असता पोलिस आयुक्त यांनी हल्लेखोरांना लवकरच अटक करून आठ दिवसात न्यायालयाला अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले
    त्यामुळे मेसाने आंदोलन मागे घेतले असून उद्यापासून सुरळीत ऑनलाईन सुरु होईल असे जिल्हाध्यक्ष रत्नाकर फाळके , जिल्हा सचिव विश्वासराव दाभाडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले