महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी निविदा काढल्याने आयुक्तांचा सत्कार

औरंगाबाद ,२९ जून /प्रतिनिधी :- अनेक वर्षापासून पासून मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद या ऐतिहासिक  शहरात जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी समाजातील विविध सामाजिक संघटनातर्फे निवेदन  देण्यात आले होते. यांची दखल घेऊन मनपाने पुतळा बसविण्यात साठी ठराव मंजूर केला.

महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा ऊभारण्यासाठी निविदा काढल्याने समाजातर्फे मनपा प्रशासक तथा आयुक्तांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती.समाजातर्फे खासदार, आमदार, महापौर, महानगरपालिकेतील समाजाचे नगरसेवक, नगरसेविका यांनीही पुतळा उभारण्यासाठी अनेक वेळा पुढाकार घेतला. मनपाचा नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये पुतळा उभारण्यासाठी निधीची मोठी तरतुद केली. दोन दिवसापूर्वी महानगरपालिकेकडून महात्मा  बसवेश्वर महाराज यांचा पुतळा उभारण्याची ऑनलाईन निविदाही प्रसिद्ध झाली. पुतळा उभारल्यानंतर शहरातील सौंदर्यात अधिक भर पडेल या अश्वारूढ पुतळ्याचा माध्यमातून या महात्माचे विचार समाजापर्यंत पोहचेल, अशी आशा आहे.

या समाजाची अपेक्षा पुर्ण करीत असल्याबद्दल  मनपा आयुक्त  अस्तिककुमार पांडे यांचा शिवसेना नेते चंद्रकांत  खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचेही अभिनंदन करून समाजातर्फे सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना शहरप्रमुख  विश्वनाथ स्वामी, लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक ज्ञानेश्वर अप्पा खर्डे,  युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, माजी नगरसेवक  सचिन खैरे, विरभद्र गादगे, शिल्पाराणी वाडकर, शोभा बुरांडे, भरत लकडे, किशोर नागरे, अनिल जैस्वाल समीतीचे जिल्हाअध्यक्ष  शिवा खांडखुळे, नंदकिशोर गंवडर, संतोष  लिंभारे, शिवानंद  मोधे, आशिष  लकडे, राजेश कोठाळे, विलास संभाहरे, शिवा स्वामी, दिपक ऊरगुंडे, विरेंद्र मंगलगे आदी समाज बांधव उपस्थीत होते.