औरंगाबाद जिल्ह्यात 105 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर,पाच मृत्यू

जिल्ह्यात 30916 कोरोनामुक्त, 3301 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद, दिनांक 10 :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 332 जणांना (मनपा 215, ग्रामीण 117) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत  30916 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 105 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35212 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 995 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3301 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 29 आणि ग्रामीण भागात 16 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (43) मार्ड हॉस्टेल परिसर (1), सुधाकर नगर (1), जय भवानी नगर (1), पवन नगर (1),  हडको परिसर (1), शिवनेरी कॉलनी, टीव्ही सेंटर (1), घाटी परिसर (1), एन नऊ परिसर (4), बीड बायपास परिसर (1), एन एक सिडको (3), एन दोन सिडको (1), समर्थ नगर (1), एसटी क्वार्टर परिसर (1), जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर (2), सिडको (1), एस टी कॉलनी (1), गारखेडा परिसर (2), कृष्णा रेसिडन्सी, अदालत रोड (1), भगतसिंग नगर (1), एन तीन सिडको (1), गरमपाणी परिसर (1), ब्रिजवाडी, एमआयडीसी परिसर (2), अरिहंत नगर (1), टीव्ही सेंटर (1), जेजे प्लस हॉस्पीटल परिसर (1), एमजीएम हॉस्टेल परिसर (1), मेहेर नगर (2), सारा गार्डन परिसर, एन दोन (1), शहानूरवाडी परिसर (1), रामा हॉटेल परिसर (3), ग्रीन ऑलिव्ह हॉटेल परिसर (1), ब्ल्यू हेवन परिसर (1)

ग्रामीण (33) औरंगाबाद (3), गंगापूर (3), कन्नड (7), वैजापूर (1), पैठण (2), टाकळी सिल्लोड (1), देवगाव रंगारी, कन्नड (1), दिनापूर, पैठण (1), गंगोत्री पार्क, वडगाव कोल्हाटी (1), साई नगर, वडगाव (1), घोसला, सोयगाव (1), तीसगाव (1), चिकटगाव, वैजापूर (1), कारखाना परिसर, कन्नड (1), मेन रोड, कन्नड (1), करंजखेड, कन्नड (1), शेंद्रा (1), साई एकनाथ हॉस्पीटल परिसर, पैठण (1), तुर्काबाद, गंगापूर (1), मारोती चौक परिसर, गंगापूर (1), भायगाव, वैजापूर (1), जळगाव, कन्नड (1)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

 घाटीत न्यू शांतीनिकेतन कॉलनीतील 84 वर्षीय पुरूष, वैजापूर तालुक्यातील नागठाण येथील 72 वर्षीय पुरूष, तिसगावातील 65 वर्षीय पुरूष, अंबिका नगर, मुकुंदवाडीतील 30 वर्षीय पुरूष, चिंचाळा, पैठणमधील 39 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.