महाविकास आघाडीच्या वतीने महामानवास अभिवादन

जालना,६ डिसेंबर/ प्रतिनिधी :-महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मस्तगड येथील पुतळ्यास माजीमंत्री राजेश टोपे, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, महानगर जिल्हाध्यक्ष शेख महेमुद यांनी पुष्पहार घालून विनम्र अभिवादन केले.

यावेळी महविकास आघाडीचे पदाधिकारी विजय पवार, राजेन्द्रजाधव,गणेश डोळस, नंदा पवार, डॉ.राजेश राऊत, अनिल अंभोरे,डॉ.विशाल धानुरे,जीवन खंडागळे, रामेश्वर कुरील यांच्यासह आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.

शिवसेनेच्या वतीने विनम्र अभिवादन

जालना जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मस्तगड येथील पुतळ्यास जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळीनगरसेवक विजय पवार, जि.प. सदस्य गणेश डोळस, वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश राऊत, विभागप्रमुख अनिल अंभोरे, जीवन खंडागळे, रामेश्वर कुरील यांच्यासह आदी पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.