नयनरम्य आतषबाजीत रावण दहनाचा रंगारंग सोहळा!

350 तोफांची सलामी,1,000 रंगीबेरंगी फटाक्यांनी आसमंत उजळला
जालना ,२५ऑक्टोबर / प्रतिनिधी :-दुष्ट प्रवृत्तींवर सतप्रवृत्तींच्या विजयाचे प्रतीक असलेल्या विजयादशमी निमित्त दसरा महोत्सव समितीच्या वतीने जे.ई.एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात आकर्षक, नयनरम्य अशा विद्युत रोषणाईत “रावण दहन” सोहळा जल्लोषात करण्यात आला.तब्बल अर्धातास 1,000 विविध रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतिषबाजी ने संपूर्ण आसमंत उजळून निघाला.प्रभू श्रीरामचंद्र की जय, जय जय श्रीराम…अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.डोळ्यांचे पारने फेडणारा सोहळा हजारो नागरिकांनी आपल्या स्मृतीत साठवला.

माजी मंत्री आ. राजेश टोपे, आ. कैलास गोरंट्याल ,पुरुषोत्तम बगडिया,घनश्यामदास गोयल,भास्करराव अंबेकर ,भास्करराव पाटील दानवे, राजेश राऊत,बबलू चौधरी, ओमप्रकाश मंत्री,
दसरा महोत्सव समितीचे मुख्य संयोजक विनीत साहनी, अध्यक्ष संजय दाड, कार्याध्यक्ष सुभाषचंद्र देवीदान, महामंत्री मनीष तवरावाला, कोषाध्यक्ष मनोज पाचफुले,सुरेश बाबू अग्रवाल, धीरेंद्र मेहरा, राजेंद्र जिंदल , डि.बी. सोनी, डॉ.आदिनाथ पाटील, गौतम मुणोत ,कुशल सकलेचा ,राहुल अग्रवाल,रितेश मिश्रा, संजय राठी, संजय करवा, योगेश मानधना, आनंद जिंदल, डॉ.संजय राख, सुनील भाई रायठठ्ठा , पुरुषोत्तम जयपुरिया,नारायण दादा चाळगे , विजयराज सुराणा, सुरेंद्र चेचाणी , जगदीश भरतीया,अशोक पांगारकर, संजय शिनगारे ,डुंगरसिंह राजपुरोहित, हिम्मतराव शिंदे, गोपीकिशन जाजू ,सुशील पांडे, विजय बगडिया ,सुनील बियाणी, सुदर्शन भुंबर ,डॉ. मंगल शुक्ला, मुकुंद देवीदान , राजेंद्र भारुका,
यांची उपस्थिती होती.

माजी मंत्री आ. राजेश टोपे,आ. कैलास गोरंट्याल, माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर, भास्करराव पाटील दानवे, विनीत साहनी यांनी प्रत्येकाने आपल्यातील वाईट विचार,गुणांचा नाश करून चांगल्या मुल्यांची रुजवण, स्वच्छ शहर, परिसराचा संकल्प करावा असे आवाहन केले.तसेच चांगल्या सामाजिक उपक्रमांत कोणीही अडथळे निर्माण करु नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रास्ताविकात समितीचे अध्यक्ष संजय दाड यांनी 43 वर्षांच्या गौरवशाली परंपरेबाबत माहिती दिली.
महामंत्री मनीष तवरावाला यांनी आपल्या भारदस्त आवाजात बहारदार सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
प्रारंभी 21 तोफांची सलामी देण्यात आली,एस चक्रे,हाप सन, समृद्धीसह 250 अनार, अशा रंगीबेरंगी फटाक्यांची तब्बल अर्धा तास आतिषबाजी करण्यात आली.प्रमूख मान्यवरांच्या हस्ते वात पेटवून रावण दहन झाले.

सामाजिक संदेशांचा दीपोत्सव..!

कार्यक्रम स्थळी रावणाच्या प्रतिमे समोर ” स्वप्न उद्याचे, स्वच्छ नद्यांचे” ” मेरा शहर मेरा अभिमान” अशा संदेशांसह स्वागत फलकांत रंगीबेरंगी दीपोत्सवाने परिसर उजळून निघाला.आतिषबाजीत दहाव्या पिढीत परंपरा जपणारे संगमनेर येथील शेख जमीर , यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी सुतळी बॉम्ब,अनार ,आकाशीक कलर, चक्री,अंब्रेला, कोकोनट ट्री, स्क्वेअर बील,थ्री व्हिल, अंब्रेला शॉवर, नायगारा फॉल्स,मोठे झाड, दरबार अनार,धबधबा, अशी तब्बल 1,000 वेगवेगळ्या प्रकारचे नजारे सादर करून डोळ्यांचे पारणे फेडले.