जालना येथून तिरुपती बालाजी साठी साप्ताहिक रेल्वे सुरु

जालना, ​३०​ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-जालना ते तिरुपती बालाजी या साप्ताहिक रेल्वे गाडीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला आहे.

जालनासह संपूर्ण मराठवाड्याला या रेल्वे सेवेमुळे तिरुपती बालाजीला जाणे सुलभ होणार असून, यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांना आनंद झाला आहे. जालना जिल्ह्यातील नागरिकांची तिरुपतीला रेल्वे गाडी सोडण्याची मागणी पूर्ण झाली आहे. सदरील रेल्वे जालना मार्गे परळी, बिदर, हुमनाबाद, रायचूर आणि तिरुपती अशी धावणार आहे. या रेल्वेमुळे मराठवाडा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील विविध ठिकाणावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आकांक्षा या रेल्वे गाडीमुळे पूर्ण होणार आहे. 

ही रेल्वे सुरू होण्यापूर्वी मराठवाडा विभागातून तिरुपती पर्यंत चार वेगवेगळ्या दिवशी साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत, मात्र यात्रेकरू प्रवाशाची वाढती संख्या पाहता या भागातून जादा रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी होत होती या अनुषंगाने प्रवासासाठी सुलभ, सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी जालना ते तिरुपती जाण्यासाठी एलएचबी कोच असलेली साप्ताहिक विशेष रेल्वे सुरू करण्यात येत आहे. सुरुवातीला ऑक्टोंबर 2022 ते डिसेंबर 2022 या महिन्यात सहा फेऱ्यासाठी जालना येथून रविवारी ११.५० वा व सोमवारी ०९.०५ वा हि रेल्वे गाडी तिरुपतीला पोहोचणार आहे. परतीच्या दिशेने सदर रेल्वे गाडी मंगळवारी १८.३० वा सुटेल आणि बुधवारी १८.०० वा जालना येथे पोहोचणार आहे.

यावेळी आ.नारायण कुचे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भास्कर (आबा) दानवे, भाजपा शहराध्यक्ष राजेश राऊत, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक आण्णा पांगारकर, अतिक खान, घनशामसेठ गोयल, अर्जुन गेही, प्रदेश सदस्य रामेश्वर पा.भांदरगे, बद्रीनाथ पठाडे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव मामा खरात, धनराज काबलिये, भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव शिंदे, नगरसेवक शशिकांत घुगे, महेश निकम, कैलास उबाळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष भागवत बावणे, भाजयुमो शहराध्यक्ष सुनील खरे, संजय डोंगरे, वसंतराव जगताप, सुरेश कदम, मसूद कुरेशी, बंसीधर आटोळे, दत्ता जाधव, सोमेश काबलिये, प्रा.राजेंद्र भोसले, सुभांगी देशपांडे, अमोल कारंजेकर, नामदेव नागवे, सुधाकर खरात, रोषण चौधरी, संजय आटोळे, शर्मिष्टा कुलकर्णी, दुर्गेश कुरील, रामजी शेजूळ, सोमेश्वर पडूळ, कृष्णा शिंदे, सुधाकर शिंदे, कुंडलिक खरात, शिवाजी निकाळजे, डोंगरसिंग साबळे, आनंद झारखंडे, अनिल सरकटे, मनोज बिडकर, आकाश देशमाने, गोविंद भताने, विवेक पाटील, मनोज इंगळे, सुहास मुंडे, अमन मित्तल, शिवाजी वेताळ, चेतन देसरडा, उद्धव डोंगरे, सुखदेव गोरे, सिद्धेश्वर हसबे, राधाकिसन काटे आदींची उपस्थिती होती.

ठळक मुद्दे : –

♦️ टेम्पल टाउन तिरुपतीला जाणाऱ्या यात्रीकरू प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा प्रदान करते.

♦️ कर्नाटकातील नवीन स्थळे उदाहरणार्थ हुमनाबाद, कुलबुर्गी आणि वाडी यांना थेट रेल्वे सुविधेद्वारे मराठवाडा प्रदेशाची जोडते.

♦️ कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मधील यादगिर, रायचूर, मंत्रालयम, गुंटकल कडप्पा इत्यादी महत्त्वाच्या शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या गरजा पूर्ण करते.

♦️ रेल्वे प्रवाशांसाठी सुरक्षित, किफायतशीर आणि आरामदायी वाहतूक प्रदान करते.

♦️ सर्व प्रकारच्या आरक्षित आणि अनारक्षित प्रवाशांसाठी योग्य.

♦️ एसी आणि नॉन एसी अशा दोन्ही वर्गाचा समावेश आहे.

♦️ प्रवाशांना भगवान बालाजी मंदिरात जाण्यासाठी आणि त्याच ट्रेनने परत येण्यासाठी पुरेसा वेळ असेल कारण ट्रेन सोमवारी पहाटे तिरुपतीला पोहोचते आणि परतीचा प्रवास तिरुपतीहून मंगळवारी संध्याकाळी पुन्हा सुरू होतो.

♦️ ट्रेन आधुनिक एलएचबी डब्यांसह चालविली जात आहे जी प्रवाशांना आरामदायी आणि वर्धित प्रवास अनुभव प्रदान करते.

♦️ ट्रेनच्या रचनेत फर्स्ट एसी, सेकंड एसी, थर्ड एसी, सेकंड स्लीपर आणि सेकंड जनरल क्लासचे डबे असतात.