आंदोलनात जखमी झालेल्यांची अर्जुन खोतकर यांनी घेतली भेट

जालना ,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :- मौजे बळेगाव तालुका अंबड येथील शरद सुखदेव नरवडे हे मराठा आंदोलनात पोलीसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. त्यांची शिवसेना नेते तथा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सिव्हिलल हॉस्पिटल जालना येथे जाऊन भेटुन आस्तेवाईकपणे चौकशी केली व योग्य त्यांच्यावर योग्य तो औषधोपचार करावा अशा आशयाच्या सूचना वैद्यकीय अधिकाऱ्याला दिल्या.त्यांच्या कुटुंबियांना आधार दिला. यावेळी त्यांच्या समवेत युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, माजी नगरपरिषद उपाध्यक्ष राजेश राऊत, शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले,शुभम टेकाळे प्रशांत वाडेकर ,संजय देठे आदींची उपस्थिती होती.