“आता आरक्षण हाच उपचार!”, मनोज जरांगेंचा तपासणीस नकार, वैद्यकीय पथक पाठवलं माघारी

जालना ,२६ऑक्टोबर / प्रतिनिधी :-मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचा आजचा दूसरा दिवस आहे. आज देखील ते केवळ दोन घोट पाणी पिऊन आहेत. दरम्यान, वैद्याकीय तपासणीसाठी आलेल्या पथकास जरांगे यांनी परत पाठवलं. मराठा आरक्षण हाच उपचार आहे. सरकारकडून आरक्षणाशिवाय काहीच घेणार नाही. असा पुनरुच्चार त्यांनी केला आहे.

राज्या सरकारा मराठा समाजाला आरक्षण देम्यासाठी मनोज जरांगे यांनी ४० दिवसांचा अवधी दिला होता. हा अवधी संपल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांनी पाठिंबा देण्यासाठी गावागावत साखळी उपोषण सुरु झालं आहे. तसंच राजकारण्यांना गावबंधी देखील करण्यात आली आहे. यावरुन मराठा आरक्षणासाठी आंदोलनाने व्यापक स्वरुप धारण देलं हे दिसून येत आहे.

बुधवारी आमरण उपोषण करताना आपण पाणी देखील पिणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं होतं. मात्र, यानंतर संभाजी राजे छत्रपती यांच्या विनंतीवरुन त्यांनी पाण्याचे दोन घोट प्राशन केलं. आज देखील त्यांनी केवल दोन घोट पाणी पिले आहे. त्यांच्या प्रकृतीत बदल दिसून येत असल्याने आज दुपारी शासनाचे वैद्यकीय पथक तपासणीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले. मात्र, जरांगे पाटील यांनी तपासणीस नकार देत पथकाला परत पाठवलं. आता सरकारकडून फक्त आरक्षण घेणार, उपचाराची गरज नाही, असं त्यांनी जाहीर केलं.