मायेच्या संबंधाने जीवाला जन्म-मृत्यूचं दुःख

“ स्वर्वेद  हा विहंगम योगाचा सैध्दांतिक सदग्रंथ आहे याची मालिका “आज दिनांक” मध्ये रोज खास वाचकांसाठी.

आजचा दोहा

जग परिवर्तनशील है, माया कारज सोय । 

क्षण वियोग क्षण योग है, जन्म मरण दुख होय ।।०६ ।।

(स्वर्वेद चतुर्थ मण्डल षष्ठ अध्याय) ०४/०६/०६

मूळ भाष्याचा मराठी अनुवाद :

मायेने बनलेले हे जड जगत परिवर्तनशील आहे. याचा क्षणात योग-वियोग होतो आणि जन्म-मृत्यूचं दुःख प्राप्त होतं. प्रकृतीतील प्रत्येक पदार्थ तीन गुणांच्या संबंधाने बनलेला आहे, ते एक रुपात राहू शकत नाही, म्हणून पदार्थांचा योग-वियोग होत असतो आणि मायेच्या संबंधाने जीवाला जन्म-मृत्यूचं दुःख प्राप्त होतं.

संदर्भ : *स्वर्वेद* 

हा ग्रंथ तुम्हाला हवा असल्यास वाॅट्स‌ॲप करा ८५५४८८३१६६.

www.vihangamyoga.org