रक्तदानाचा महायज्ञ : युवा सेनेच्या शिबिरात एकशे अकरा जणांचे रक्तदान…!

अभिमन्यू खोतकर यांचे कार्य गौरवास्पद : राजेश टोपे

जालना:  

सर्वसामान्यांचे प्रश्न तडीस लावणे, संकटात गरज पडेल तिथे धावून जाण्याचा वडीलांकडून मिळालेला वारसा जोपासून युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी राज्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने  मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन रक्तदानाचा भरवलेला महायज्ञ असे  अभिमन्यू खोतकर यांचे सुरू असलेले सर्वव्यापी कार्य गौरवास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज येथे बोलताना काढले. 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी  केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून  युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांच्या वतीने भाग्यनगर येथील   माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या  संपर्क कार्यालयात आयोजित महारक्तदान शिबिराचा शुभारंभ रविवारी ( ता. ०७)     आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी टोपे बोलत होते. शिवसेना नेते तथा माजी मंत्री अर्जुनराव खोतकर , शिवसेना जिल्हाप्रमुख  भास्करराव अंबेकर, ए. जे. बोराडे, माजी आ. संतोष सांबरे ,माजी जि.प.अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर ,आयोजक तथा युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर, युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, पंडीतराव भुतेकर, संजय खोतकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा  सविताताई किवंडे,संतोष मोहिते, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, डॉ.आत्मानंद भक्त, जि. प. सभापती जय प्रकाश चव्हाण, पांडुरंग डोंगरे, अमोल ठाकूर, भरत सांबरे, अजय कदम,शहर प्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांची प्रमुख उपस्थिती होती. युवा सेनेच्या वतीने आयोजित महारक्तदान   शिबिरास पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद लाभला. सुरक्षित  अंतराचे पालन करून एकशे अकरा रक्तदात्यांनी  रक्तदान केले . 


राजेश टोपे पुढे म्हणाले की, कोरोना  संसर्ग प्रादुर्भावाच्या  सुरुवातीच्या कालखंडात मोठ्या प्रमाणात रक्तदान झाले. संकलित केलेले रक्त 40 ते 45 दिवस साठवून ठेवता येते. त्यामुळे आता रक्ताचा तुटवडा भासत असल्याने अभिमन्यू खोतकर व युवा सेनेने आयोजित केलेल्या शिबिरातून रक्तसाठा अधिक वाढणार असून राज्य शासनाच्या आवाहनास  सर्वपक्षीय प्रतिसाद मिळत असल्याने युवा सेने प्रमाणेच   सर्वांनी उपक्रम  राबवावेत. असे आवाहनही राजेश टोपे यांनी केले. 
 माजी जि. प . अध्यक्ष अनिरूध्द खोतकर,माजी .आ.संतोष सांबरे, शिवसेना जिल्हाप्रमुख ए. जे.बोराडे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात आयोजक तथा राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी युवा सेनेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देऊन कोरोना संशयित रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार तसेच युवासेना प्रमुख ना.आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि युवा सेना  सचिव वरून सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महारक्तदान शिबीर  आयोजित करण्यात आले असून या शिबीरास शिवसेना, युवा सेना पदाधिकारी व युवा सैनिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत पहिल्याच दिवशी तब्बल १११ जणांनी रक्तदानाचा केलेला संकल्प पूर्ण होत असल्याची माहिती अभिमन्यू खोतकर  दिली.  सूत्रसंचालन युवा सेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी केले तर शहरप्रमुख दुर्गेश काठोठीवाले यांनी आभार मानले. यावेळी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विजय पवार, नगरसेवक  अशोक पवार,  निखिल पगारे ,संदीप नाईकवाडे, किशोर पांगारकर ,विजय जाधव, राम सतकर, संताजी वाघमारे, जे.के.चव्हाण ,गणेश सुपारकर, घनश्याम खाकीवाले, दिनेश भगत,राजेश घोडे, किशोर शिंदे, अंकुश पाचफुले,सुशील भावसार, संतोष परळकर,मूरलीधर काकड,जफर खान,  बिलाल सौदागर, मंजू घायाळ, गंगुबाई वानखेडे, मंगल मेटकर, लखन कणिसे, देवेंद्र बुंदेले, योगेश रत्नपारखे,अमोल दुसाने,विक्रम कुसूंदल, अंकुश पाचफुले,सुमीत पाटील,अमित ठाकूर,सागर पाटील, नागेश डवले, राजू सलामपुरे, अक्षय वल्लाकट्टी, किरण कोकाटे, गणेश चौधरी, प्रशांत म्हस्के, भागवत शिंदे, कैलास घोडे, सद्दाम चाऊस,विठ्ठल एखंडे,सचिन कांबळे, श्री कृष्ण वायाळ, मंगेश काळे, यांच्या सह शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना पदाधिकारी व युवा सैनिकांची उपस्थिती होती. 

जालनेकर रक्तदानास सदैव तत्पर : माजी मंत्री खोतकर 
संपूर्ण राज्यात रक्तदानाची मोठी चळवळ उभी करणारे  शहर म्हणून जालना शहराचा नावलौकीक असून गरज पडेल तेव्हा रक्तदान करण्यासाठी जालनेकर सदैव तत्पर राहतील. असा विश्वास शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत शिवसेना व युवा सेनेच्या वतीने रक्तदान शिबिरे सुरू आहेत. असे सांगून खोतकर म्हणाले, ही पक्षाची भूमिका असतांना जालना येथील शिबीराचे उद्दघाटन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते होत असल्याने राज्यात वेगळा आदर्श निर्माण झाला असून नवा संदेश या निमित्ताने जाईल. 

शिबीरामुळे तरूणांना स्फुर्ती : भास्कर राव आंबेकर 
 समाजकारणात अग्रेसर असलेल्या युवासेना राज्य  विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी गरजेच्या काळात आयोजित केलेल्या महारक्तदान शिबीरामुळे तरूणांना  सेवेची नवी स्फुर्ती मिळाली. असे गौरवोद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अांबेकर यांनी यावेळी व्यक्त केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून युवा सेनेने पुढाकार घेतला ही समाधानाची बाब असून या शिबीरात तरुणाईच्या गर्दीला नवी दिशा मिळेल. असा विश्वास ही भास्करराव आंबेकर  यांनी व्यक्त केला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *