जालना जिल्ह्यात 52 संशयीत कोरोना बाधीत

जालना दि. 14 :-

जालना   जिल्ह्यात मंगळवारी रात्री 52 संशयीत रुग्णांचे अहवाल कोरोना बाधीत आढळून आले असून त्यापैकी 50 रुग्ण हे जालना शहरातील  आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या आता 1099 इतकी झाली आहे.  सर्वाधिक 10 रुग्ण हे माणिक नगर, कन्हैयानगर 6,ममादेवी नगर 4,समर्थनगर 3,रामनगर 2,एस. टी. कॉलनी 2,शकुंतला नगर,आणि तेरापंथी भवन ,SRPF राज बिल्डींग, नाथबाबा गल्ली,क्रांतीनगर, चिफ मशिनरी स्टोअर महावीर चौक,भाग्यनगर,बरवार गल्ली,जेईएस कॉलनी,मतींन नगर,कसबा, कालिकुर्ती, विठ्ठल नगर,श्रीमान नगर गांधी रोड, रामनगर, इंदोननगर,व्यंकटेश नगर,भीमनगर, मिशन हॉस्पिटल जवळ,अंबर हॉटेल जवळ,अयोध्या नगर या भागातील प्रत्येकी एक, भोकरदन तालुक्यातील धावडा आणि जालना तालुक्यातील पिरकल्याण येथील प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण 52 रुग्ण आढळून आले आहेत. 

सोमवारी दिवसभर आणि मंगळवारी दिवसभर एकही रुग्ण पाॅझीटीव्ह  आढळून न आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात होते. मात्र मंगळवारी  रात्री उशिरा 52 रूग्णांची भर पडली  आणखी सुमारे 200 हून अधिक  नमुने प्रयोग शाळेकडे प्रलंबित असल्याने  बुधवारी सकाळी नेमकी किती रूग्णांची वाढ होते याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे.

जालना शहरातील सुवर्णकार नगर -1, नळगल्ली -1, सामान्य रुग्णालय परिसरातील -1, मिशन हॉस्पिटल जवळील-7 मनिषानगर बगडीया हॉटेल जवळ -2, सहयोगनगर- 1, मुलींचे वसतिगृह- 1, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह-1, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसतिगृह -1, शिवनगर-3, मामा चौक परिसर -14, जांगडानगर -2, चुर्मापुरी ता. अंबड -1, सिनगाव जहांगीर ता. देऊळगाव राजा -1, अशा एकूण 37 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकाही व्य्क्तीच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण– 5447, असुन सध्या रुग्णालयात -292 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती- 2136, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या–415 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-7748 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने–52 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1099 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या -6059,रिजेक्टेड नमुने -20, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-421 एकुण प्रलंबित नमुने- 622,यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 1799.

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती–26, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती–1573, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती -08, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -485, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत -41, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -292,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-48, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-37, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-704, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-264 तर संदर्भित (रेफर) केलेली रुग्ण संख्या-34, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-17192,तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 45 एवढी आहे.

जालना शहरातील नुतन वसाहत परिसरातील रहिवासी असलेला 45 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 8 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 10 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 13 जुलै 2020 रोजी रात्री 11.45 मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला तसेच बाजीउम्रद ता. जालना येथील रहिवासी असलेला 55 वर्षीय महिला रुग्णास श्वसनाचा, फुप्फुसाचा जुनाट आजार व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 10 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आल होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 6 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 13 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6.15 वाजता त्यांचा मृत्यु झाला. तर जालना शहरातील पेंशनपुरा परिसरातील रहिवासी असलेला 65 वर्षीय पुरुष रुग्णास श्वसनाचा , मधुमेह, उच्च् रक्तदाब व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 10 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 12 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्यांच्यावर उपचार सुरु असतांनाच दि. 13 जुलै 2020 रोजी सायंकाळी 6.30 मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस 181 व्यक्तींना अटक करण्यात आली असुन -962 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 871 वाहने जप्त,आय. पी. सी. 188 प्रमाणे मा. न्यायालयाने ठोठावलेला दंड-99 हजार 600, मुददेमाल जप्त -26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 5 लाख 70 हजार 330 असा एकुण 6 लाख 96 हजार738 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *