मराठा -कुणबी समितीच्या कार्यकक्षा सकल मराठा समाजावर अन्याय करणारी-संजय लाखे पाटील 

जालना ,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची कार्यकक्षा ही मराठवाड्यातील निजामशाहीतील मराठा ‘समुहास’ न्याय देण्यासाठी पुरेशी सुस्पष्ट नसून अतिशय अन्यायकारक आणि मराठा समूह म्हणून अन्यायकारक असून केवळ काही व्यक्तींना यातून न्याय मिळू शकेल आणि सकल मराठा समाजावर अन्याय होईल अशी‌ कार्यकक्षा रचना केलेली आहे असा आक्षेप जय लाखेपाटील मराठा क्रांती मोर्चा आणि सकळ मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला आहे.

या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,

आपल्या अध्यक्षतेखालील समितीला दिलेली कार्यकक्षा ही मराठवाड्यातील निजामशाहीतील मराठा ‘समुहास’ न्याय देण्यासाठी पुरेशी सुस्पष्ट नसून अतिशय अन्यायकारक आणि मराठा समूह म्हणून अन्यायकारक असून केवळ काही व्यक्तींना यातून न्याय मिळू शकेल आणि सकल मराठा समाजावर अन्याय होईल अशी‌ कार्यकक्षा रचना केलेली आहे असे दिसते. कारण ”तपासाअंती ‘पात्र व्यक्तींना (मराठा समुहाला नाही) जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहीत करण्यासाठी” असा सुस्पष्ट उल्लेख आहे.!

ब) परंतु त्यातील निजामकालीन पुरावे, महसुली पुरावे, आणि अतिशय महत्त्वाचे

म्हणजे ‘राष्ट्रीय दस्तऐवज’ या पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणे ह्या अंतर्गत मी /आम्ही पुढील सर्व निजामशाहीतील वैधानिक राष्ट्रीय दस्तावेज आणि जनगणना या अतिशय महत्त्वाच्या महसूल/प्रशासकीय कामकाजाचे विस्तृत असे पुरावे सादर करत आहोत की, ज्यामुळे तत्कालीन निजामशाहीत मराठा आणि कुणबी ‘समाज/समुहाच्या’ वैध, कायदेशीर प्रशासकीय पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करून तपासणीअंती निजामशाहीतील मराठा आणि कुणबी या ‘एकच असलेल्या’ समुहाला (community व्यक्ती नव्हे) जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहीत करून तशी वैधानिक शिफारस करू शकाल.!

यातील सर्वात महत्त्वाचे राष्ट्रीय दस्तावेज म्हणजे तत्कालीन ‘जनगणना रिपोर्ट’ असून निजामशाहीमध्ये Census of India या ब्रिटिश इंडिया या अधिकृत जनगणनेअंतर्गतच हैदराबाद संस्थानची अतिशय शास्त्रशुद्ध दशवार्षीक जनगणना झालेली असून त्याचे ‘राष्ट्रीय दस्तऐवज’ उपलब्ध असून १८८१ (पुर्ण १८८४),१८९१, १९०१, १९११,१९२१, १९३१ आणि १९४१ च्या जनगणना अहवालाचा मी पुर्ण अभ्यास केला असून त्यानुसार पुढील अतिशय महत्त्वाच्या नोंदी मी आपल्यासमोर सदर ‘राष्ट्रीय दस्तऐवज’ सह मांडत आहे/दाखल करत आहे.!

तसेच१८८१ च्या जातनिहाय जनगणना नुसार Gazetteer of the nizam’s dominion (facsimile Reproduction) Aurangabad district original printed in १८८४) या अस्सल राष्ट्रीय दस्तावेज कडे आणि त्यातील वैध नोंदीकडे ही मी आपले लक्ष वेधू इच्छीतो! सदर नोंदीनुसार निजामकालीन १८८१ च्या जातनिहाय जनगणना (तत्कालीन जिल्हा औरंगाबाद-including जालना) नुसार तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यातील तालुका निहाय जातनोंदीमध्ये प्रत्येक तालुक्यात इतर सर्व जाती प्रमाणे कुणबी जातीच्या नोंदी आहेत. यामध्ये स्वतंत्र मराठा जातीचा कोठेही उल्लेख नाही. त्यामुळे असे सिद्ध होते की आजची प्रचलित मराठा जात हीच तत्कालीन कुणबी जात आहे. आणि हीच परिस्थिती तत्कालीन औरंगाबाद सह नांदेड, उस्मानाबाद, बीड आणि परभणी या पाचही जिल्ह्यात नोंदवलेली आहे!

‘दशवार्षीक जनगणना नोंदीमधील’ Cast तसेच Community च्या ‘राष्ट्रीय दस्तावेज नोंदी’ आपणासमोर सादर करत आहे. सदर जनगणना या Cast नव्हे तर Community group टेबल नुसार झालेल्या आहेत हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.!

Census of India 1901 Volume xxii Hyderabad state (Annexure 01) –

सदर जनगणनेच्या कम्युनिटी ग्रूप टेबल नुसार मराठा आणि कुणबी या ‘कापू’ या जात समुहात ठेवण्यात आलेली असून त्यातच कुणबी आणि वंजारा हे जात समुह सुध्दा आहेत. (Page 224) आणि Subsidiary table iii यातही मराठा आणि कुणबी या एकत्र आहेत. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, वेलमा, या सामाजिक समुहापेक्षा ‘कापू’ हा वेगळा आणि स्वतंत्र समूह ठेवलेला असून (page 250 and 254) यामधे मराठा आणि कुणबी हे इतर कृषक समाजाबरोबर सामाजिक समूह म्हणून ठेवलेले/मोजलेले आहेत.! म्हणजे मराठा आणि कुणबी हे एकच सामाजिक समूह आहेत हे निर्विवाद सिद्ध झाले आहे.!

२) Census of India १९११ Volume XIX Hyderabad state part I report (Annexure०२) यातील Subsidiary Table I (page-१४१) Casts Classified according to their traditional occupation अन्वये Cultivators (including growers of special products) या जातीसमुहात हटकर,कापू, कोळी,कुर्मी, माळी, मराठा, मुण्णार, तेलगा ,वाकलीगर अश्या जातसमुहात मराठा आणि कुर्मी (कुणबी) यांना एकत्रित दाखवले आहे. ( Also pls see page number १४२ also) या १९९१ च्या Census of India या राष्ट्रीय दस्तावेज नोंदीनुसार अर्थ आणि स्थिती स्पष्ट आहे मराठा आणि कुणबी हटकर, माळी, वंजारी हे समकक्ष जातसमुहात असून मराठा आणि कुणबी यांचे सामाजिक स्थिती ऊच्च/निच्च अशी नाही.!

३) Census of India १९२१ Volume XXI, Hyderabad state Part I report (Annexure ०३ ) या राष्ट्रीय दस्तावेज मधील‌‌ नोंदीनुसार (Ps see chapter XI Caste tribe and Race page २१७ to २८३) ज्या स्वयंस्पष्ट असून यातील group no II Cultivators ( including growers and special products) या ग्रूपमध्ये (page २२२) हटकर,कोळी, कुणबी, लोडी, माळी,मराठा, मुण्णार, तेलंगा, वंजारी हा एकच जातसमुह असून इतरांबरोबर मराठा आणि कुणबी यांचे सामाजिक स्थान समान आहे.! तसेच Subsidy table I cast classified according their traditional occupation ( page २३४) Cultivators या दूस-या एकत्रित गटात हटकर, कोळी, कुणबी, लोडी, माळी, मराठा, मुण्णार, तेलंगा, वंजारा असा जातसमुह दाखवलेला असून मराठा आणि कुणबी हे ईतर कृषक समाजाबरोबर एकाच सामाजिक स्थितीत आहेत.! उच्चनिच्च नाही.

निष्कर्ष- 1921 च्या राष्ट्रीय जनगणना या राष्ट्रीय दस्तावेज नुसार मराठा आणि कुणबी हे समकक्ष आणि एकच आहेत.!

४) Census of India १९३१ Volume Xxiii H.E.H. the Nizam’s Dominions Hyderabad state part-I report (annexure ०४) या राष्ट्रीय दस्तावेज नोंदीनुसार ज्या अतिशय महत्त्वाचे आणि अभ्यासनीय आहेत. त्यातील १६४ general observation (page २४६) १६५, again १६५ regrouping of casts यात मराठा, कुणबी किंवा Cultivator जातसमुहाचे regrouping दिसून येत नाही पण page no २५१ वरील Subsidiary Table I – cast classification according to traditional occupation या टेबल नुसार ग्रूप ०२ मधील Cultivator (including growers of special products) या जातीसमुहात हटकर, कोळी, कुणबी, लोडी, माळी, मराठा, मुण्णार, तेलंगा, बंजारा या जातीसमुहात मराठा आणि कुणबी एकत्रच असून एकाच सामाजिक गटात आहेत.! उच्चनिच्च नाही! वरखाली नाही! वेगवेगळ्या जातसमुहात नाही हे अतिशय महत्त्वाचे आहे.! आणि याही राष्ट्रीय दस्तावेज नोंदीनुसार मराठा आणि कुणबी हे एकच आहेत.!

५) census of India १९४१ Volume XXI H.E.H. The Nizam’s Dominions Hyderabad state part-I report (annexure ०५) मधील राष्ट्रीय दस्तावेज नोंदीनुसार जनगणना कश्या शास्त्रीय पध्दतीने केली जात होती यासंदर्भात विस्तृत आणि मौलिक माहिती दिली असून जातसमुह माहिती वगळल्याबद्दल खुलासा केला आहे.

Regarding caste tabulation, the Census Commissioner for India in his Report, Table Volume, page १४ noted “The sanctioned table action for British India does not cover caste but even had the full course been taken, there would have been no all-India caste table. Even in १९३१ it was severely limited, for financial reasons, the time is past for this enormous and costly table as part of the central undertaking and I share Dr. Hutton’s views expressed १० years ago. With so constricted a financial position and with so many fields awaiting an entry there is no justification for spending lakhs on this detail. In १९४१ castes sorting on an all-India scale was dropped.” (Page २१८)

वरील सर्व राष्ट्रीय दस्तावेज नोंदीनुसार मराठा हे मराठा म्हणून आणि कुणबी हे कुणबी म्हणून वैयक्तिक नव्हे तर समूह म्हणून एकत्रितरित्या मराठा- कुणबी, कूणबी-मराठा म्हणून सामाजिक दृष्ट्या एकाच समुहात असल्यामुळे एकत्रित आरक्षणास पात्र आहेत म्हणून निजामशाही राजवटीतील मराठ्यांना सरगगट समुह म्हणून “मराठा -कुणबी किंवा कुणबी मराठा” या वर्गवारी नुसार आरक्षणास ‘पात्र’ घोषीत करून जात प्रमाणपत्र देण्यासाठी शिफारशीत करावे अशी मी आपणास निजामशाही राजवटीतील राष्ट्रीय दस्ताऐवजी ‘अकाट्य’ पुराव्याच्या आधारावर मागणी आणि विनंती करतो.

यावेळी डॉ. संजय लाखेपाटिल, सुभाष कोळकर, शरद देशमुख, माऊली कदम, डाके पाटिल, राजेंद्र गोरे, अर्जुन गजर, विकास पाटिल, प्रा. नरसींग पवार, रमेश गजर, संदीप जगताप, अनिल वाघमारे, अनील हजारे आदींची उपस्थिती होती.