आमदार अपात्रतेची सुनावणी आज होणार

मुंबई,११ ऑक्टोबर  /प्रतिनिधी :-शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी उद्या म्हणजे १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. यापूर्वी शिवसेना आमदार अपात्रेतसंदर्भातील सुनावणी १३ ऑक्टोबरला होणार होती. पण राहुल नार्वेकरांना दिल्लीतील कार्यक्रमासाठी जायचे असल्याने एक दिवस आधी म्हणजे गुरुवारी  आमदार अपात्रतेसंदर्भात सुनावणी होणार आहे, अशी माहिती त्यांनी स्वत: आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात राहुल नार्वेकर म्हणाले, “दिल्लीत एका कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटना हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या कार्यक्रमाचे मला आमंत्रण आल्यामुळे त्या कार्यक्रमात उपस्थित राहणे आवश्यक आहे. यामुळे मी आमदार अपात्रतेची सुनावणी ही परवा घेणार होते. पण आता ही सुनावणी १२ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. मला आमदार अपात्रतेविषयात कोणत्याही प्रकारची दिरंगाई करायची नाही आणि लवकरात लवकर निर्णय घेईचा आहे. मला कोणताही वेळ वाया घालवायचा नाही म्हणून एक दिवश आधी ती सुनावणी घेऊन कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे,” अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली आहे.