जालना जिल्ह्यात 156 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह

जालना दि.7 :- जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 83 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे.आरटीपीसीआर तपासणीव्दा रे 149 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 7 व्यक्तींचा अशा एकुण 156 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-11883असुन सध्या रुग्णालयात-268 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4184, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-177, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-39162 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-53, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-156 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-5782 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-32967, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-312, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3784

14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-35, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3622 आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-58,सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-739, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-54, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-268,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-60, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-83, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4136, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1490 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-56365 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 156 एवढी आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात लव्हाळा ता. मेहकर येथील 60 वर्षीय कोरोना बाधित पुरुष रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात मास्क न वापरणे, सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचे पालन न करणा-या एकुण 4 हजार 565 नागरीकांकडुन 9 लाख 65 हजार 160 रुपये एवढा दंड वसुल करण्यासत आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *