औरंगाबाद जिल्हृयातील शेतकऱ्यांना एकूण 1240 कोटी कर्ज वितरण

बॅकांनी पीक कर्ज वितरणाचे शंभर टक्के उद्द्दीष्ट साध्य करावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद, दि.28 :- जिल्हृयातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज देऊन बॅकांनी पीक कर्ज वितरणाचे शंभर टक्के उद्द्दीष्ट साध्य करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बँकांच्या समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्यांनी संबंधितांना निर्देशित केले. यावेळी जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकार, बँक ऑफ महाराष्ट्र चे क्षेत्रिय उपप्रबन्धक सुभाष सहारे व जिल्ह्यातील बँकांचे क्षेत्रिय प्रबंधक, समन्वयक, जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यातील बँकानी या वर्षी खरीपासाठी पीक कर्जाचे उद्द्दीष्टाच्या 103.63 टक्के एवढे पीक कर्ज वितरण केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी बॅकांचे अभिनंदन करुन रब्बी हंगामासाठीसुद्धा शंभर टक्के पेक्षा जास्त उद्द्दीष्ट साध्य करण्याचे आवाहन केले. तसेच शासकीय योजनेच्या अंतर्गत येणारी प्रकरणे वेळेत निकाली काढण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी संबंधितांना दिले.जिल्ह्याला खरीपासाठी पीक कर्जाचे रु. 1196.79 कोटीचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले असून दि. 28 ऑगस्ट 2020 पर्यंत 2,37,700 शेतकऱ्यांना एकूण रु. 1240.29 कोटी कर्ज वितरण करण्यात आले असल्याची माहिती श्री कारेगावकर यांनी यावेळी दिली.