श्री स्वामी समर्थ केंद्रात सात दिवशीय श्रीमद भागवत ग्रंथ पारायण आरंभ

वैजापूर,२१ जुलै /प्रतिनिधी :-येथील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक संस्कार केंद्रात अधिक मांस निमित्त शुक्रवारपासून (ता.21) सात दिवशीय श्रीमद भागवत ग्रंथ पारायण या केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती सुमनबाई  आलूले यांच्या मार्गदर्शनाखाली आरंभ झाले. या पारायणास ४१ महिला बसलेल्या असून त्या दररोज पारायण करणार आहे. वाचिका श्रीमती मोनिका गंडे व अनिता राजपूत आहेत. सोनालीताई त्रिभुवन यांनी या पारायण चे नियोजन केले आहे.