सोनचिरैया उपजीविका केंद्राच्या माध्यमातून महिला सक्षम व सबल बनणार – नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी

वैजापूर ,९ मार्च / प्रतिनिधी :- देशातील महिला स्वावलंबी व सक्षम बनण्यासाठी राष्ट्रीय नागरी उपजीविका केंद्रे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार असून शहरी भागातील महिला बचत गटाच्या जास्तीत जास्त सदस्यांनी या केंद्रातून मिळणाऱ्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन  नगराध्यक्षा शिल्पाताई दिनेश परदेशी यांनी गुरुवारी (ता.09) या केंद्राचे उदघाटन करतांना केले. 

महिलांसाठीचे अत्यंत महत्वाचे सोनचिरैया उपजीविका केंद्र आजपासून पालिका आवारात सुरू झाले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष साबेरखान व मुखयधिकारी भागवत बिघोत यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल ही यावेळी लावण्यात आले होते. या स्टॉलवरील वस्तूंची विक्रीही मोठ्या प्रमाणात झाली. शहरी गरीब उत्पादक व ग्राहक यांची सांगड घालून व शहरी गरिबांना माहिती देणे व व्यवसायसाठी आवश्यक ते अर्थसहाय्य करणे हा उपजीविका केंद्राचा मुख्य उद्देश होय.

कार्यक्रमाचे सूत्र संचलन व महिलांना मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले. बचत गट महिला व सदस्यांची मोफत आरोग तपासणी ही यावेळी करण्यात आली. मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनीही बचत महिला गट सदस्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी नगरसेवक प्रकाश चव्हाण, सखाहरी बर्डे, स्वप्नील जेजुरकर, गणेश खैरे, इम्रान कुरेशी, बिलाल सौदागर, शैलेश चव्हाण, दिनेश राजपूत, अजय भुजबळ, रियाज शेख, नगरसेविका डॉ.प्रिती भोपळे, सुप्रिया व्यवहारे, नंदाबाई त्रिभुवन, मुमताज सौदागर, द्वारकाबाई घाटे यांची उपस्थिती होती. सहायक संघटक दिवाकर त्रिभुवन, समनव्यक सुनील भाग्यवंत तसेच सुर्यकांता काकडे, चित्रा थोरात,जयश्री सोनवणे, ललिता देशमुख, रोहिणी नाईकवाडी, सायली निंबाळकर, सोनाली रिस्वाल यांनी सहभाग नोंदवला. शेवटी सुनील भाग्यवंत यांनी आभार मानले.