वैजापूर भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी लाईव्ह पाहिला ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रम

वैजापूर ,२७ जून/ प्रतिनिधी :-‘मेरा बुथ सबसे मजबूत’ या लाईव्ह कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सवांद साधला. भोपाळ येथून लाईव्ह हा कार्यक्रम वैजापूर येथील भाजप कार्यकर्त्यांनी लाईव्ह पाहिला. 

भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पाहण्यासाठी नियोजन करण्यात आले होते. वैजापूर शहरातील क्रांती फिटनेस क्लब येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भोपाळ येथून लाईव्ह ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम पहिला. भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे, शहराध्यक्ष दिनेश राजपूत, नगरसेवक दशरथ बनकर, ज्ञानेश्वर पाटील जगताप, कैलास पवार, गणेश खैरे, शैलेश पोंदे, प्रेमसिंग राजपूत, सोमू सोमवंशी, किरण व्यवहारे, गिरीश चापानेरकर आदी यावेळी उपस्थित होते.