शिवसेनेच्या वतीने १६ एप्रिल रोजी स्वयंरोजगार मेळावा

औरंगाबाद ,१४ एप्रिल  /प्रतिनिधी :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत शहरातील होतकरू नागरिकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार असून याकरिता शिवसेना औरंगाबादच्यावतीने भव्य स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक १६ एप्रिल शनिवार रोजी सकाळी १०:०० वाजता पाटीदार भवन , हॉटेल अमरप्रीत समोर, जालना रोड याठिकाणी करण्यात आले असल्याचे आयोजक शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , युवासेना प्रमुख पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ,पालकमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडी संपर्कप्रमुख आमदार मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्वयंरोजगार मेळाव्यास मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार ,आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय शिरसाट, आमदार रमेश बोरणारे, आमदार उदयसिंह राजपूत, महापौर नंदकुमार घोडेले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

माझा व्यवसाय माझा हक्क या संकल्पनेतून या मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त व भटक्या जाती जमाती आर्थिक विकास महामंडळ या शासनाच्या विविध रोजगारनिर्मिती योजनांची माहिती मिळणार आहे त्याचप्रमाणे या योजनांच्या माध्यमातून  ८० ते ९५ टक्के बँक कर्ज उपलब्ध, व्यवसायिक वाहन खरेदी ,आपल्या पसंतीचा फिरता व्यवसाय, वस्तू व शेतमाल याची वाहतूक, विविध खाद्यपदार्थ विक्री व्यवसाय साठी कर्ज उपलब्ध विषयी सविस्तर माहिती या मेळाव्यात मिळणार आहे.स्वतःचा पसंतीचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तरुण-तरुणी त्याचप्रमाणे नागरिकांनी या स्वयंरोजगार मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना शहरप्रमुख विजय वाघचौरे, बाळासाहेब थोरात ,विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, युवासेना उपसचिव माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपसचिव ऋषिकेश खैरे ,जिल्हाधिकारी हनुमान शिंदे युवासेना कॉलेज कक्ष प्रमुख ऋषिकेश जैस्वाल यांनी केले आहे.