पोलिसांच्या मदतीला धावला सलमान खान
बॉलिवूडचा दबंग हिरो सलमान खान करोनाविरुद्धच्या युद्धात मदतीसाठी समोर आला आहे, गरजूंना अन्न-धान्य वाटप असो किंवा रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना आर्थिक मदत सलमान खान याने सढळहस्ते मदत देऊ केली आहे. आता तो मुंबई पोलिसांच्या मदतीला धावला आहे. त्यानं मुंबई पोलिसांच्या आरोग्याचा विचार करुन १ लाख सॅनिटायझरच्या बॉटल्स उपलब्ध करुन दिल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी सलमाननं स्वत:चा (FRSH) या नावाचा लाइफस्टाइल प्रोडक्टचा एक ब्रॅन्ड लॉन्च केला आहे. याच ब्रॅन्डचे १ लाख सॅनिटायझर त्यानं पोलिसांना दिले आहेत. पोलिस दलातील सुमारे सव्वादोन लाख पोलिस करोनाविरुद्ध योद्धा बनून जनतेसाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांच्यातील काही जवानांना करोनाची बाधाही झाली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनने सलमानने केलेली मदत मोठी ठरणार आहे. मुख्यमंत्र्याच्या सीएमओ ऑफिसच्या ट्विटर अकाऊंटवरून सलमानचे आभार मानन्यात आले आहेत. यापूर्वी अभिनेता अक्षय कुमार यानं मुंबई पोलिसांनी १००० फिटनेस रिस्टबँड्स दिले आहेत. या रिस्टबँड्समुळं मुंबई पोलिसांना मदत मदत होणार आहे.