दहेगाव येथे नागपूर- मुंबई रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम 

काँट्रॅक्टरला धारेवर धरून उत्कृष्ट काम करून घेतले  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाला यश

वैजापूर ,२७ जून/ प्रतिनिधी :-वैजापूर तालुक्यातील दहेगाव येथील नागपूर – मुंबई हायवेच्या तब्बल वीस वर्षापासून रखडलेलले रस्त्याचे काम  अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिलीप आवारे पाटील, मनसे जिल्हाउपाध्यक्ष ॲड. अनिल (दादा) वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन करत संबंधित कॉन्ट्रॅक्टर व प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आणि  कॉन्ट्रॅक्टरला धारेवर धरत उत्कृष्ट दर्जाचे काम करून घेतले व दहेगाव येथील नागरिकांना उत्कृष्ट दर्जाचा रस्ता करून न्याय मिळवून दिला.यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सोपान पाटील जाधव गटनेता सुनील राजपूत  यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्यासंखेने उपस्थित होते.