वाहनांची तपासणी करणाऱ्या वाहतूक निरीक्षकाकडून दुजाभाव ; वाहन चालकांमध्ये संताप

वैजापूर ,२७ जून/ प्रतिनिधी :-क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात माल वाहतूक करणाऱ्या वाहनाची वाहनांची तपासणी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात परिवहन अधिकारी दुजाभाव करत असल्याची ओरड वाहन चालकांकडून केली जात आहे. या कारवाईत मोटार वाहन निरीक्षकांनी ओव्हर लोड आढळून आलेले वाहने कारवाई न करता सोडून दिली. मात्र काही  ठराविक वाहनाना कारवाईचे मेमो देण्यात आला.

मोटार व्हेईकल इन्स्पेक्टर अमोल खैरनार यांनी यावेळी काही अधिक वजनाचे वाहतुक करणा-या वाहने कारवाई न करता सोडून दिल्याचे तक्रार वाहन चालक संघटनेचे राहुल लांडे यांनी केली आहे. या कारवाई चा पुरावा म्हणून त्यांनी चित्रित केलेला व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर  केला असून यामध्ये अधिकारी खैरनार यांच्या संशयास्पद कारवाई कशी पध्दतीने करत होते यांचा पर्दाफाश होईल असा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान भेदभावाच्या कारवाईमुळ वाहन चालकांमध्ये मोटार वाहन निरीक्षका विरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे हा प्रकार वैजापूर तालुक्यामध्ये गुरुकृपा ब्रिजवर घडल्याचा तक्रारदारानी सांगितले. 

काय आहे नेमका प्रकार…

मोटार व्हेहीकल इन्स्पेक्टर अमोल खैरनार यांनी 16 जून रोजी सकाळी ७ ते ९ वाजेच्या दरम्यान शुक्रा पेट्रोलियम समोर लाडगाव (ता.वैजापूर जिल्हा- औरंगाबाद) गुरुकृपा वे ब्रीजवर काही गाड्या ओव्हरलोड असताना देखील सोडून दिल्या. मात्र काहींनाच मेमो दिला आहे. सर्व गाड्या ओव्हरलोड असल्याकारणाने सर्व गाड्याना मेमो देणे गरजेचे होते परंतु असे न करता या अधिकाऱ्याने काही गाड्या मेमो न लावता सोडून दिल्या.

ओव्हरलोड असलेल्या गाड्या गाडी क्रमांक MH 21 BH 5922 , MH 20  EL 0978, MH 43 U 5854 कारवाईत या सर्व गाड्या ओव्हरलोड होत्या. गाड्यांचे वजन मोटार व्हेंहिकल इन्स्पेक्टर अमोल खैरनार यांच्या समोर त्यांनी स्वतः गुरुकृपा वे ब्रिज लाडगाव या वे ब्रिज वर घेतल्या. वजन केले असता सदर गाड्या ओव्हरलोड आढळून आल्या परंतु त्यांनी मेमो फक्त MH 43 U 5854 ला दिला आणि या  MH 21 BH 5922 , MH 20 EL 0978 दोन्ही पण गाड्या मेमो न देता सोडून दिल्या यावरून असे निदर्शनास येते की या अधिकाऱ्याने स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी शासनाचा देखील रेव्हेन्यू बुडविला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी. सदरील अधिकाऱ्याने मर्यादेपेक्षा जास्त वजन घेऊन जाणाऱ्या गाड्यांना पकडून त्यांची तपासणी करण्यात आली वजन जास्त आढळून आलेला असताना देखील काही गाड्यांना सोडून देण्यात आलं तर ठराविक गाड्यांना मेमो देण्यात आला असे तक्रारदार राहुल लांडे यांचे म्हणणे आहे.