जैन अलर्ट ग्रुप, वैजापूरतर्फे शालेय विद्यार्थ्यांना मायेची ऊब,70 गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

वैजापूर,८ जानेवारी /प्रतिनिधी :- मायेची ऊब ही फक्त स्पर्शातच असते असे नाही तर ती संकट समयी दिलेल्या आधाराच्या शब्दांत आणि गरजवंताला दिलेल्या मदतीतही असते.

Displaying IMG-20220107-WA0177.jpg

कोरोनाच्या या महामारी सारख्या भयावह संकटात एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ या उक्तीने एकमेकांना मदत आणि आधार दोन्ही गोष्टी महत्वाच्या ठरल्यात. अशा या महामारीच्या संकट समयी मदतीसाठी सदैव तयार असतो तो म्हणजे जैन समाज. जैन अलर्ट ग्रुप वैजापूर यांच्याकडून आज महाराष्ट्रातील पहिली वर्षाचे 365 दिवस दिवसराञ चालणा-या व लोकसहभागातून 20 संगणकाची भव्य अशी प्रयोग शाळा निर्माण केलेल्या व गुणवत्तापूर्ण व सामाजिक मूल्यांचे शिक्षण देणा-या व नाविण्यपूर्ण उपक्रमात अग्रक्रमाची शाळा म्हणून तालुका व जिल्ह्यातही नावाजलेल्या ISO मानांकित हिंगेवस्ती शाळेतील 25 विद्यार्थ्यांना, तसेच स्व.सुंदराबाई गायकवाड नगर परिषद प्राथमिक शाळा, फुलेवाडी, वैजापुर येथील 19 गरजवंत विद्यार्थ्यांना तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडे वस्ती, खंबाळा, ता.वैजापूर येथील गरजवंत 24 विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करुन या लेकरांना मायेची ऊबच दिलेली आहे.

जैन अलर्ट ग्रृप वैजापूर यांनी मायेची उब देणा-या स्वेटर वितरणासाठी हिंगे वस्ती शाळा, न.प.प्रा.शा. फुलेवाडी व जि.प.प्रा.शा.लांडे वस्ती ची निवड केल्याबद्दल केंद्रप्रमुख पारखे , मुख्याध्यापक संजय गायकवाड सर, मुख्याध्यापक संजय कुमावत सर, मुख्याध्यापक सरकटे सर यांनी मनस्वी आभार मानले. यावेळी निलेशकुमार पारख, धीरजकुमार बोथरा, परेशकुमार संचेती, अभिजीतभैया साखरे, प्रविण कोतकर, शैलेश पोंदे, यौगेश फुलारे, सन्मितसिंग खनिजो, भास्कर पा. कोल्हे, कचरू पा. कोल्हे, विष्णु गोरे, शिवाजी खुरसणे, विजय हिंगे सर, अविनाश बहीर सर आदी उपस्थित होते. यासाठी निलेशभाई जैन, प्रकाश कोटेचा यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.