शिवना टाकळीचे मध्यम प्रकल्पाचे पाणी धोंदलगाव शिवारापर्यंत सोडण्यात यावे या मागणीसाठी माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी धोंदलगाव शिवारापर्यंत पोहचविण्याचे पाटबंधारे विभागाचे लेखी आश्वासन

वैजापूर,१२ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-शिवना टाकळी मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात सध्या पाणी सोडलेले असून ते पाणी धोंदलगाव शिवारापर्यंत यावे यासाठी पाथरी, भायगाव गंगा, धोंदलगाव शिवारातील पाटाची दुरुस्ती तात्काळ करावी आणि पाणी धोंदलगाव शिवारापर्यंत पोहचावे. या मागणीसाठी वैजापूर तालुक्याचे माजी आमदार  भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या नेतृत्वाखाली अधीक्षक अभियंता, लघुबंधारे विभाग, औरंगाबाद कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या मागण्या संबंधित विभागाने मान्य केल्या असून तसे लेखी आश्वासन यावेळी देण्यात आले. 

या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनकर पवार, डॉ.मनोज ताजी, माजी सरपंच प्रा.अशोक म्हस्के, माजी सरपंच आण्णासाहेब डमाळे, माजी सरपंच कैलास आवारे, उपसरपंच डॉ.कमलेश साबळे, चेअरमन बाळासाहेब आवारे, माजी चेअरमन बबनराव हरिचंद्रे, माजी उपसरपंच माणिकराव निघोटे, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ भालेकर, बाळासाहेब वाघ, राजु दादा शेलार, गोपाल कदम, बाबासाहेब दरेकर, बळीराम वाघ, रावसाहेब वैद्य, बन्सी जिवरग, संतोष पानसरे, पोपट आवारे, काकासाहेब काळे, दिलीप आवारे, ज्ञानेश्वर डमाळे, आबासाहेब वैद्य, नामदेव जाधव, दिलीप वाघ, बबन दळे, भागिनाथ सोनवणे, विष्णू पानसरे, संजय डमाळे,  एकनाथ गवारे, गोटिराम आवारे, चेतन वाघ, सिकंदर सय्यद, गणेश आवारे, पोपट आवारे, रघुनाथ पानसरे, विशाल सोळस, लक्ष्मण पवार, बाबासाहेब पवार, गुलाब पवार सह मोठ्या संख्येने शेतकरी व संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, कर्मचारी उपस्थित होते.