भाजपचे एकनाथराव जाधव यांच्यातर्फे मोफत ई-श्रम कार्डचे वाटप

वैजापूर, १५ नोव्हेंबर / प्रतिनिधी :- भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यकारिणी सदस्य एकनाथराव जाधव यांच्यामार्फत तालुकाभर राबविण्यात आलेल्या ई-श्रम कार्ड योजनेचे कार्ड वाटप मंगळवारी (ता.15) भाजपा अनुसूचित जाती आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष  बाळासाहेब गायकवाड यांच्याहस्ते करण्यात आले. 

तालुक्यातील परसोडा, भिवगाव, बेंदवाडी व भिंगी या चार गावात इ-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी बाळासाहेब गायकवाड यांनी ई-श्रम कार्ड योजनेविषयी नागरिकांना सविस्तर माहिती दिली. तसेच नारायण कवडे यांनी देखील भाजप सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. 

या प्रसंगी हुकूम दादा छानवाल, आसाराम मरमठ, नारायण कवडे, किशोर धाडबळे, रणजित बैनाडे, शरद कवडे, रामभाऊ कवडे, नारायण धाडबळे, बाळू कवडे, मंगेश धाडबळे, शिवाजी आधुडे. भिवगाव येथे ज्ञानेश्वर गायके (सरपंच) बाबासाहेब गायके, रविंद्र लेंबे, गोरख मुखे, संजय काळे, आप्पा काळे, रमेश पठारे, दादासाहेब गायके (परसोडा) राजाराम भक्कड, भीमसिंग कहाटे, अर्जुन कहाटे, देवचंद कहाटे, उध्दल गोमलाडू, भगवान गोमलाडू, विलास डोंगरजाळ, भिंगीत योगेश घायवट, किसन तांबे, बाळू गायकवाड, गौतम गायकवाड, संजय घायवट, दिपक गायकवाड, मोबीन खान, हमीद जिलानी यांच्यासह चारही गावात नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.