आचार्य श्री 108 पुलकसागर महाराज यांचे वैजापुरात स्वागत; 18 नोव्हेंबरपर्यंत  दरम्यान प्रवचन

वैजापूर, १६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-भारत गौरव राष्ट्रसंत आचार्य श्री 108 पुलकसागर महाराज यांचे बुधवारी (ता.16) गंगापूरमार्गे वैजापुरात आगमन होताच शहरवासियांच्यावतीने नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, उपनगराध्यक्ष साबेरखान, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. दिनेशपरदेशी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाशशेठ बोथरा, निलेश पारख, हेमंत संचेती, पालिकेचे शिक्षण सभापती दशरथ बनकर, सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत,वनगरसेविका माधुरी बनकर, डॉ. संतोष गंगवाल, विजय कासलीवाल, दिनेश राजपूत, संजय बोरणारे, सुभाष बोहरा ,राजू संचेती आदींनी त्यांचे उत्साहात  स्वागत केले.

लेझीम पथक, भक्ती व भावगीते सादर करून वैजापूर शहरवासियांनी आचार्य पुलकसागरजी महाराज यांचे आदरातिथ्य करून स्वागत केले. शहरातील महिला व पुरुष ही त्यांच्या आगमन फेरीत सहभागी झाले होते. रस्त्यात जागोजागी त्याचे पूजन झाल. आजपासून तीन दिवस(16,17,18 नोव्हेंबर )सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत येथील जैन स्थानकात महाराजांचे प्रवचन होणार आहे. या प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.