वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार ; उपजिल्हानिबंधकाकडे सादर
वैजापूर, १६ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अठरा संचालक पदाच्या निवडणूकीसाठी जिल्हा उपनिबंधकाकडे प्रारुप मतदार यादी सादर करण्यात आली आहे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी प्रारुप मतदार यादी तयार केली. राज्य निवडणूक प्राधिकरणाने 01 सप्टेंबर 2022 या अर्हता दिनांका नुसार बाजार समितीतील चार मतदारसंघासाठी प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली आहे.दरम्यान येथील एकूण 115 सहकारी संस्थेपैकी केवळ 67 सोसायटीतील सभासद मतदारांचा प्रारुप मतदार यादीत अर्हता दिंनाका नुसार समावेश असल्याची माहिती सहाय्यक सहकार निबंधक विनय धोटे यांनी दिली.त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना निघालेल्या उर्वरित सोसायटीचे संचालक तसेच 25 ग्रामपंचायतीसाठी डिसेंबर महिन्यात निवडणूकीतील नवीन सदस्यांना मतदानासाठी पुरवणी मतदार यादीत त्यांचे नावे समाविष्ट करण्यासाठी पाठपुरावा करावा लागणार सहकार विभागाने सहकारी संस्था ( 67 )ग्रामपंचायत ( 131 ) व्यापारी (162 )हमाल मापाडी (320) या मतदार संघातील प्रारुप मतदार यादी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याकडे सादर केल्या.दरम्यान सोसायटी निवडणूक प्रक्रिया तालुक्यात अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिल्या.
संचालक मंडळाचे मतदार संघ निहाय जागा…
सहकारी संस्था मतदार संघ – 11 जागा
ग्रामपंचायत मतदार संघ – 04 जागा
व्यापारी मतदार संघ – 02 जागा
हमाल मापाडी मतदार संघ – 01 जागा