मनसेचे वैजापुरात आंदोलन ; तहसीलदार यांना मागण्याचे निवेदन

वैजापूर ,​१० मार्च / प्रतिनिधी :- तहसील कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली व शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप आवारे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी दिलीप आवारे, अनिल वाळुंज यांनी आलेल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार कुलकर्णी यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यामध्ये विभक्त झालेल्या तालुक्यातील सर्व लोकांना रेशन मिळाले पाहिजे व तालुक्यातील शेतकऱ्यांनी जो पीक विमा भरलेला आहे त्याचा लाभ मिळाला पाहिजे त्याचबरोबर शासनाने जाहीर केलेली अकरा कोटी रुपये रुपयाचे अनुदान त्वरित शेतकऱ्यांना वितरित करण्यात यावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

आंदोलन यशस्वी करण्यासाठी राजेंद्र मोठे,  सोपान जाधव, कवीश्वर कोल्हे, संतोष सोमवंशी, सुनील राजपूत, आजिनाथ गुजर, अमोल मोईन, गणेश कदम, विजय तुपे, राजेंद्र ठोंबरे, स्वप्नील आंबेकर, सागर वाळुंज, रामदास पंचमेंढे, अर्जुन पंचमेंढे, सोमनाथ पगारे, नंदलाल घोडके, गणेश मापारी, स्वप्निल पगारे, गणेश वाळुंज, प्रभाकर वाळुंज, सागर मोठे, वाल्मीक आवारे, संतोष थोरात, जयप्रकाश मोठे नाना मोठे,भारत वाळुंज, छोटू साळुंखे, देविदास मोठे आनंद वाळुंज, नान मोठे, प्रसाद मोठे, बंडू साळुंखे आशुतोष गव्हाळे, सादिक पठाण, लतीफ पठाण दीपक तुपे,योगेश तुपे, भागवत साळुंखे, अजय आवारे विशाल सोळस, लक्ष्मण बोर्डे, गणेश वाघ, गणेश रोटे मिलिंद हिवराळे, योगेश उगले, नवनाथ मलिक, दीपक तुपे, राहुल तुपे, गणेश तुपे, काकासाहेब उगले, गुलाब पवार उपस्थित होते.