जयश्रीताई पाटील चिकटगावकर यांचे अल्पशा आजाराने निधन

वैजापूर,२२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार कै. कैलास पाटील चिकटगावकर याच्या पत्नी जयश्रीताई पाटील (वय 62 वर्ष) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी औरंगाबाद येथे निधन झाले.माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्या त्या वहिनी व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अभय पाटील चिकटगांवकर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सून असा परिवार आहे. शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता चिकटगाव (आमराई) येथे त्यांचा अंत्यविधी होईल.