वैजापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश : उध्दव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन

वैजापूर,२२ सप्टेंबर  /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी (ता.22) मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेना पक्षात प्रवेश घेतला.

शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,  खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,  उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील गलांडे, तालुकाप्रमुख सचिन पाटील वाणी, शहरप्रमुख प्रकाश पाटील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यास युवा सेना तालुकाप्रमुख विठ्ठल पाटील ढमाळे, युवासेना उपतालुकाप्रमुख अक्षय पाटील साठे, अनिल पाटील न्हावले, राजू पाटील गलांडे, योगेश मोहिते यांच्यासह शेकडो शिवसैनिक युवा सैनिक उपस्थित होते.

यावेळी जानेफळचे सरपंच जितेंद्र पाटील जगदाळे, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन कल्याणराव जगदाळे, पेंडेफळचे सरपंच सोपान पाटील आहेर, ग्रामपंचायत सदस्य विश्वात्मक कुहिले, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष छगन पाटील जगदाळे, करंजगांवचे ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील उगले, दीपक भाऊ मतसागर, सुनील मतसागर, प्रकाश मतसागर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला.